जळगाव : कारागृहातून पलायन केलेला गौरव विजय पाटील हा अमळनेरातील त्याच्या दोन मित्रांसह पळून जाण्यासाठी मदतीला आलेल्या जगदीश पुंडलिक पाटील (रा.पिंपळकोठा, ता.पारोळा) याच्या सतत संपर्कात होता व मोबाईलवर ठरलेल्या नियोजनानुसार गुंडाळेल्या पोळीत जीवंत काडतूस टाकून गणेश नगराकडून भींतीवरुन कारागृहात फेकल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गौरवजवळ कारागृहात मोबाईल असल्याचे देखील समोर आलेले आहे.दरम्यान, कारागृहातून पलायन केल्यानंतर सुशील मगरे याने त्याच्याजवळील मोबाईलवरुन पहूर येथे ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून आईशी संपर्क साधला होता असे देखील तपासात उघड झाले आहे. या दोन दिवसात पोलिसांनी १२ जणांची चौकशी केली, त्यातील चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. सुशील मगरे याची पत्नी, मगरेसोबत पुण्यातील कोथरुडमधील ज्वेलर्सवरील दरोड्यातील आरोपीची देखील चौकशी करण्यात आली.तपास एलसीबीकडे वर्ग, नूतन अधीक्षक रुजूतीन बंदीवानांनी पलायन केल्याचा गुन्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी जिल्हा पेठ पोलिसांकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. दुसरीकडे नव्याने नियुक्त झालेले कारागृहाचे अधीक्षक गजानन पाटील रविवारी कारागृहात रुजू झाले.आक्षेपार्ह आॅडीओ क्लीप पोलिसांच्या हातीया प्रकरणाशी संबंधी काही आॅडीओ क्लीप पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्यातील संवादानुसार २४ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत पोळीतून गावठी पिस्तुलचे जीवंत काडतूस भींतीवरुन फेकल्याचा संवाद असून या आधी देखील अशाच पध्दतीने खाण्याच्या वस्तू फेकण्यात आल्याचाही उल्लेख आलेला आहे. गौरव हा अमळनेरातील त्याच्या दोन मिंत्राशी बोलत आहे. तसेच जगदीश तुझ्याकडे पार्सल घ्यायला येईल, ते त्याला दे यासह एका दुचाकीची व्यवस्था करुन ठेवण्याचेही गौरव त्याच्या मित्रांशी बोलत आहे. त्यानंतर जगदीश सकाळीच गौरवच्या मित्राशी संवाद साधून गौरवचे पार्सल घ्यायला येत असल्याचा उल्लेख आहे.या आॅडीओ क्लीप पोलिसांसाठी महत्वाचा पुरावा असून पलायन केलेल्या चौघांपर्यंत पोहचण्यात मदत होऊ शकते.फुटेज व फोटो व्हायरल...कारागृह रक्षक पंडीत गुंडाळे यांच्या डोक्याला गावठी पिस्तुल लावून सुशील अशोक मगरे (३२,रा.कसबे पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील (२१, रा.तांबापुरा, अमळनेर) व सागर संजय पाटील (२२, पैलाड,अमळनेर) या तीन न्यायालयीन बंदींनी कारागृहातून पलायन केल्याची थरारक घटना शनिवारी सकाळी ७.२५ वाजता घडली होती. रेकॉर्डवर असलेला जगदीश पुंडलिक पाटील (१८, रा.पिंपळकोठा, ता.पारोळा) याने या तिघांना दुचाकीवर पळविले आहे. पोलिसांनी संशयिताचे फुटेज व फोटो राज्य व इतर राज्यात व्हायरल केले. सहा पथके या चौघांच्या मागावर आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम व इतर कर्मचारी या तीन जणांची माहिती काढत आहेत.
काडतूस घातलेली पोळी कारागृहाच्या भींतीवरुन फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:06 PM