गणेश वाघ/ऑनलाईन लोकमत विशेष
भुसावळ,दि.27 - शहरातील भारत नगरासह पवन नगरात टोळक्याने केलेल्या गोळीबारात जळगावातील जिल्हा पेठेतील एका पोलिसाच्या मुलाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आह़े पोलीस सूत्रांनी मात्र हा तपासाचा भाग असल्याचे सांगत तो केवळ पोलिसांच्या नजरेतील संशयीत असल्याचे सांगितले आहे.
रविवारी रात्री 10़30 वाजेच्या सुमारास भुसावळच्या पवन नगरात गुन्हेगारांच्या टोळक्याने केलेल्या गोळीबारात निखील झांबरे गंभीर जखमी झाला होता तर भारतनगरात गावठी कट्टय़ातून तीन फैरी झाडण्यात आल्याने रहिवासी धास्तावले होत़े पोलिसांनी या प्रकरणी संशयीत आरोपी गौरव बढे, मुकेश भालेराव, नानु बॉक्सरसह अन्य तीन आरोपींविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता़
एकास अटक, दुसरा ताब्यात
पोलिसांनी श्यामल शशीकांत सपकाळे (कोळी) यास मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अटक केली. तर जळगाव येथून सुशील इंगळे (खळवाडी, भुसावळ) यास मंगळवारी सकाळी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल़े संशयीताचा गोळीबार प्रकरणात सहभाग आहे किंवा नाही याबाबत चौकशी केल्यानंतरच काही सांगता येईल, असे सूत्रांनी सांगितल़े
गोळीबारात पोलिसाच्या मुलाचा सहभाग
जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीला असलेल्याएका पोलीस कर्मचा:याच्या मुलाचा गोळीबार प्रकरणात सहभाग असल्याची दाट शक्यता आता पुढे येत आहे. त्या दृष्टीने या कर्मचा:याची मदत घेऊ त्याच्या मुलाचा शोध सुरू करण्यात आला़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या बाबीला दुजोरा दिला़ ते म्हणाले की, नानु बॉक्सर नावाचे दोन इसम असून दोघांचाही आम्ही शोध घेत आहोत़ त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अधिक काही सांगता येईल़ संशयीताच्या शोधासाठी पोलीस असलेल्या वडिलांची मदत घेतली जात असून ते पोलिसांना सहकार्यदेखील करीत आहेत़