ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी घेतली तक्रारीची दखलशिक्षण क्षेत्रात खळबळ
ऑनलाईन लोकमत
फैजपूर, जि. जळगाव, दि. 22- बनावट नॉन क्रिमीलेअर सादर करून फैजपूर (ता. यावल) येथील जे.टी.महाजन तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी व शासनाला खोटी माहिती पुरवल्याप्रकरणी प्राचार्यांसह तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे.