जामनेर : शहरात अचानक दगावलेल्या डुक्कर मृत्यू प्रकरणी गुरुवारी दयाराम उखर्डू शिंदे (रा. बजरंगपुरा, जामनेर) यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जामनेर शहरात सुमारे १०० डुक्कर मृत्यूमुखी पडल्याने शहरवासीय भयभीत झाले होते. शहरात प्रथम बीएसएनएल कार्यालयाजवळील गलाठी नाला परिसरात डुकरे मृतावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर हळूहळू इतरही भागात डुकरे मृतावस्थेत आढळून येऊ लागले. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या मृत डुकरांची विल्हेवाट लावली.या प्रकरणी बुधवारी पशूसंवर्धन विभागाने न.पा.कडून माहितीही घेतली. गुुरुवारी डुक्कर मृत्यू प्रकरणी गुरुवारी दयाराम उखर्डू शिंदे (रा. बजरंगपुरा, जामनेर) यांनी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीत शिंदे यांनी म्हटले आहे की, माझ्या मालकीच्या ५० डुकरांवर विषप्रयोग केल्याने ते मृत्यूमुखी पडले. या प्रकरणातील आरोपींविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भादंवी कलम ४२९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार दिलीप वाघमोडे तपास करीत आहे.
जामनेर येथील डुक्कर मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 9:29 PM