- जिजाबराव वाघ
चाळीसगाव (जि.जळगाव) : भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र भगवान उर्फ बाळू मोरे (६०) यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी वापरलेली कार नागद परिसरातील सायगव्हाण गावाजवळ बुधवारी रात्री आढळून आली. महेंद्र मोरे यांच्यावर पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी गोळीबार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती.
गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (वय २१, रा. चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरुन उद्देश उर्फ गुड्डू शिंदे (रा. हिरापूर), सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा. हुडको काॕलनी, चाळीसगाव), सॕम चव्हाण (रा. हिरापूर), भूपेश सोनवणे (रा. चाळीसगाव), सुमित भोसले (रा. चाळीसगाव), संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.