जळगाव : शहरातील मुक्ताईनगरातील सुहास प्रोव्हीजन या किराणा दुकानात ब्रेड, टोमॅटो सॉस, लोणचे व अन्य खाद्य पदार्थाचा ताव मारुन चोरट्यांनी तेलाचा डबा, तेलाचे पाऊच, बटाटे चिप्स यासह रोकड लांबविली तर समोरच असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांता कमलाकर वाणी यांच्या बंद घरातील ३० हजाराची रोकड व ५ हजाराचे चांदीचे दागिने असा ३५ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.दरम्यान, चोरट्यांनी शांता वाणी यांच्या ‘लोकशाही’ या बंगल्यातील सीसीटीव्हीचे तीन कॅमेरे फोडून बाहेर फेकले आहेत तर एका कॅमेऱ्याची दिशा बदलविण्यात आली आहे. चोरी करणारे दोन जण असून ते एका कॅमेºयात कैद झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन ठशांचे नमुने घेतले आहेत.पत्रा वाकवून किराणा दुकानात प्रवेशएसएमआयटी महाविद्यालयाच्या पाठीमागे सुहास प्रभाकर खडके यांच्या मालकीचे सुहास प्रोव्हीजन नावाचे किराणा दुकान आहे. खडके हे सकाळी आठ वाजता दुकानात आले असता पत्रा वाकलेला होता तर प्लायवूडही तुटलेले होते. दुकानात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पत्रा वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. गल्लयातील नेमकी किती रक्कम गेली हे खडके यांनाही सांगता आले नाही, मात्र खाद्य पदार्थावर ताव मारण्यासह चोरट्यांनी ते लांबविले आहे.वाणी यांचे घर भर रस्त्यावर आहे. दिवसरात्र या रस्त्यावर वाहतूक सुरु असते, असे असताना त्यांच्या घरात चोरी झाली.सीसीटीव्ही कॅमेरे फोडले व एका कॅमेºयाची दिशाही बदलविलीएसएमआयटी महाविद्यालयाच्या भिंतीवरुन उडी मारुन या चोरट्यांनी समोरील शांता वाणी यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडले व एका कॅमेºयाची दिशा बदलविली. त्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरुममधील एका कपाटातील ३० हजार रुपये तर दुसºया कपाटातील पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने या चोरट्यांनी लांबविले. शांता वाणी या पतीसह आठ दिवसांपासून पुणे येथे गेलेल्या आहेत. त्यामुळे घराला कुलूप होते.
जळगावात खाद्य पदार्र्थांवर ताव मारुन चोरट्यांनी लांबविली रोकड व चांदीचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:33 PM
सामाजिक कार्यकर्त्या शांता वाणी यांचे घर फोडले
ठळक मुद्देमुक्ताईनगरात दोन घरफोड्या पत्रा वाकवून किराणा दुकानात प्रवेश