रिंगणगाव, ता.एरंडोल : येथे एका शेतक:याच्या घरास अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्यासोबत घर खरेदीसाठी जमविलेले 2 लाख 75 हजार व कापूस विक्रीतून आलेले 30 हजार असे एकूण 3 लाख रु. जळून खाक झाले. ही घटना सोमवारी सकाळी 9.30 वाजता घडली. गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मिळेल त्या साधनाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आणि आग आटोक्यात आणली.रिंगणगाव येथील बाबूलाल हिरामण बाविस्कर यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. ते शेती करून आपला चरितार्थ चालवितात. शेतीचे उत्पन्न आणि वडिलांकडून घर खरेदीसाठी उसने घेतलेले पावणेतीन लाख रु. व संसारोपयोगी साहित्य यांची या आगीत जळून राखरांगोळी झाली आहे. हा परिवार पूर्णपणे उघडय़ावर आला आहे.बाविस्कर हे कोळीवाडय़ात आपल्या कुटुंबासह राहतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आज सकाळी ते लवकर शेतात निघून गेले. मात्र त्यांच्या बंद घरातून अचानक धुराचे लोट निघू लागल्याने आणि घरात आग लागल्याचे दिसल्याने शेजारी राहणा:या महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळेल त्या साधनाने आणि मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचे प्रयत्न केले. दरम्यान, गावात लगAकार्य असल्यामुळे तिथे उभा असलेला पाण्याचा टँकर लगेच तरुणांनी घटनास्थळी आणला व पाणी मारण्यास सुरुवात केली. घटनेचे वृत्त कळताच तलाठी पानपाटील यांनी अगिAशमन दलास कळविले आणि अवघ्या 20 मिनिटात एरंडोल, जळगावचे अगिAशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. घरास आग लागल्याचे समजताच बाविस्कर कुटुंबीयांनी घराकडे धाव घेतली. तोर्पयत तरुणांनी धाब्यावर चढून टीकाव, पावडय़ाने माती टाकण्याचे काम सुरू केले होते. अगिAशमन बंब गावात आला पण विजेच्या तारा ह्या गल्लीत खूप खाली असल्याने वीज प्रवाह उतरण्याचा धोका होता. त्यामुळे वीज प्रवाह उपकेंद्रावरून लगेच बंद करण्यात आला आणि अगिAशमन दलाच्या जवानाने निमुळत्या गल्लीतून गाडी पास करून घटनास्थळ गाठत आग आटोक्यात आणली. जैन इरिगेशन कंपनीचा दुसरा अगिAशमन बंबदेखील गावात दाखल झाला होता. मात्र तोर्पयत आग आटोक्यात आणली गेली.आगीचे वृत्त समजताच सर्व गावक:यांनी घटनास्थळी धाव घेतली व आपापल्या परिने आग विझविण्याचे प्रयत्न केले. या वेळी बाबूलाल बाविस्कर यांनी घरातून पैशांचा डबा काढून आणला. मात्र त्यात ठेवलेल्या 500, 100, 2000 रु. च्या नोटा जळून खाक झाल्या होत्या. तर काही अर्धवट जळालेल्या होत्या. हे पाहून बाविस्कर कुटुंबीयांनी आक्रोश केला. या वेळी उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. घटनास्थळी नायब तहसीलदार आबा महाजन, वरिष्ठ लिपिक हरणे, तलाठी पानपाटील, पोलीस पाटील वासुदेव मोरे, ग्रामसेवक सतीश सूर्यवंशी व ग्रा.पं. पदाधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. आगीत विष्णू विश्राम बाविस्कर व बापू बाविस्कर यांचीही घरे जळून नुकसान झाले आहे. आगीचा पंचनामा करण्यात आला असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जीव धोक्यात घालून काढली गॅस हंडी घरातून धुराचे लोट निघत असल्याचे समजताच दरवाजा तोडण्यात आला. मात्र घरात धुराच्या साम्राज्यामुळे काहीच दिसत नव्हते. काही तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून गॅस हंडी उचलून अंगणात आणली व त्यावर पाण्याचा मारा सुरू केला. या गॅस हंडीने पेट घेतला असता तर स्फोट होऊन अनर्थ होण्याची शक्यता होती. पण सुदैवाने ते टळले.
घर खरेदीसाठी जमवलेली तीन लाखांची रोकड खाक
By admin | Published: April 18, 2017 12:33 AM