आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२ : जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, दुपारी २ ते ४ वाजेच्या सुमारास तापमानाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या काळात नागरिकांनी घरातून बाहेर निघणे टाळावे असे आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा सरासरी ४१ अंशावर कायम असून, रविवारी जळगावचे तापमान ४२ अंश इतके होते.आगामी दोन दिवस तापमानाचा पारा कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे आणि उष्ण राहण्याची अपेक्षा आहे. जळगाव शहरात तापमानाचा कहर जाणवत असून, दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी ११ वाजेपासून रस्त्यांवर संचारबंदी सदृश्य परिस्थिती दिसून येत आहे. सायंकाळी ६ वाजेनंतरच नागरिक घराबाहेर निघण्याचे धाडस करत आहे.हे आहे उष्णतेच्या लाटेचे कारणउष्णतेच्या लाटेचे महत्वाचे कारण म्हणजे कोरडे व उष्ण उत्तर पश्चिमी आंतर्देशीय वारे हे आहे. हे वारे गरम हवेच्या जास्त दाबाकडून म्हणजेच मध्य प्रदेश आणि गुजरात या शेजारच्या राज्यांतून वाहत येतात की जिथे आधीच तापमान जास्त असते. या व्यतिरिक्त, संपूर्ण राज्यात कोरडे व उष्ण हवामान देखील वाढत आहे. तसेच य वाऱ्यांचा वेग देखील १५ किमी प्रतितास असल्याने उष्णतेच्या झळा देखील असह्य होत आहे.राज्यात जळगाव चौथ्या क्रमांकावरउष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम हा मध्य महाराष्टÑ व विदर्भातील जिल्ह्यांवर झालेला दिसून येत आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक तापमान ४२.८ अंश चंद्रपूर येथे नोंदण्यात आले. त्या खालोखाल अकोला ४२.५ अंश, तिसºया क्रमांकावर बुलढाणा पारा ४२.२ अंश तर जळगाव शहराच्या तापमानाची ४२ अंश इतकी नोंद करण्यात आली आहे.आगामी दोन दिवस जरी उष्णतेची लाट कायम राहणार असली, तरी चार ते पाच दिवसात जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा आगामी काही दिवसात विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात देखील ढगाळ हवामान व पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसामुळे तापमानात देखील घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
सावधान..दुपारी घरातून निघणे टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 4:20 PM
जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, दुपारी २ ते ४ वाजेच्या सुमारास तापमानाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या काळात नागरिकांनी घरातून बाहेर निघणे टाळावे असे आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
ठळक मुद्देजळगावात उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन प्रभावीतदुपारी २ ते ४ दरम्यान तापमानाचा उच्चांकआगामी चार दिवसात पावसाचा अंदाज