शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

जळगावात सीबीएसई बारावी परीक्षेच्या निकालात ‘क्षितिज’ चमकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 12:50 PM

विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पाहिला निकाल

ठळक मुद्देतासभर झाली होती वेबसाईट हँग

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बारावी बोर्डाचा निकाल शनिवारी दुपारी साडेबारा वाजता संकेतस्थळावर जाहीर झाला़ यामध्ये शहरातील बारावीच्या सीबीएसईच्या पाच शाळांमध्ये रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी क्षितिज प्रसाद जगताप याने सर्वाधिक ९६़.२ टक्के गुण मिळवून आपली चमक दाखवली.शनिवारी निकाल लागणार म्हणून विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती़ अखेर दुपारी साडेबारा वाजता संकेतस्थळावर आॅनलाइन निकाल जाहीर झाला़ त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक संकेतस्थळावर निकाल पाहत असताना संकेतस्थळ हँग झाले़ तब्बल एक तासापर्यंत निकाल पाहता आला नाही़ त्यानंतर ही संकेतस्थळ सुरळीत झाले अन् विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता आला़रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, उमवि केंद्रीय विद्यालय, सेंट जोसेफ, गोदावरी सीबीएसई स्कूल, ओरियन स्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांनी मार्च व एप्रिल महिन्यात परीक्षा दिली होती़ यामधील गोदावरी, सेंट जोसेफ व केंद्रीय महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला आहे़ सेंट जोसेफच्या मिलोनी दीपक अटल या विद्यार्थिनीनेही ९५़.४ गुण प्राप्त करत विशेष यश संपादन केले आहे़असा आहे शाळानिहाय निकालरुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमधील क्षितिज प्रसाद जगताप हा विद्यार्थी ९६़.२ टक्के गुण मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. साक्षी रवींद्र राणे ९२़.८ टक्के गुण मिळवून द्वितीय तर दीक्षा सुनील चोरडिया हिने ९२़.२ टक्के गुण मिळवून शाळेतून तिसरा क्रमांक मिळविला.सेंट जोसेफ स्कूलमधील मिलोनी दीपक अटल हिने ९५़ .४ टक्के गुण मिळवून प्रथम तर अजिंक्य संजय पाटील ९४ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला, तर वंशिका सुनील मंधान ८५़ .२ टक्के गुण मिळवून तिसरी ठरली आहे़ओरियन स्कूलमधून पूजा संजय थोरात हिने ९०़.४० टक्के मिळवून प्रथम तर मानसी मनोज महाजन हिने ९०़२० टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक प्राप्त केला. नंदिनी विजय भन्साली ८४़.६० गुण मिळवून तिसरी ठरली़केंद्रीय विद्यालयातून रोशन झाल्टे ८७ टक्के गुण मिळवित प्रथम तर अमेय रामटेके ७९ टक्के मिळवून द्वितीय व अपूर्वा दामले ७८ टक्के गुण मिळवून तिसरी ठरली आहे़गोदावरी विद्यालयात अमेय जयंत लाठी हा ८९.४ टक्के मिळवून शाळेतून प्रथम तर ८५.४ टक्के मिळवत आदित्य पाटील द्वितीय, ७८.८ टक्के मिळवत सिद्धांत प्रशांत जाधव तृतीय क्रमाकाने उत्तीर्ण झाला.

टॅग्स :CBSE 12th Result 2018सीबीएसई बारावी परीक्षा निकाल २०१८Jalgaonजळगाव