जळगाव : लॉकडाउनदरम्यान जिल्ह्यात कापूस खरेदी सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र, मजूर उपलब्ध नसल्याने जिनर्स पाठोपाठ आता सीसीआय व पणन महासंघानेदेखील कापूस खरेदीस नकार दिला आहे. त्यामुळे आता कापूस खरेदी लॉकडाउननंतरच सुुरू होणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सीसीआयचे संचालक पन्नालाल सिंंग व पणन महासंघाच्या संचालकांची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीआय व पणन महासंघाला कापूस खरेदी करण्याचा सूचना दिल्या. यावेळी सीसीआयच्या अधिकाºयांनी खरेदी केंद्र सुरू करायला हरकत नसल्याचे सांगितले. मात्र, सद्यस्थितीत मजूूर उपलब्ध नसल्याने कापूस खरेदी सुरु होऊ शकत नसल्याची माहिती सीसीआयच्या अधिकाºयांनी दिली. त्यावर जिल्हाधिकाºयांनी आपापल्या भागातील मजुरांना घेऊन कापूस खरेदीस सुरुवात करावी, अशा सूचना दिल्या. मात्र, सीसीआयच्या अनेक केंद्रावर मध्यप्रदेश, धुळे व नंदुरबार येथील मजूर काम करत असतात. लॉकडाउनमध्ये हे मजूर जिल्ह्यात येऊ शकत नसल्याची अडचण सीसीआयच्या अधिकाºयांनी दिली. जिल्हाधिकाºयांनीदेखील बाहेरचे मजूर घेऊन खरेदी केंद्र सुरू करता येणार नाही. जर स्थानिक मजूर मिळत असतील तर खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करा अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
जिनर्ससह सीसीआयचा कापूस खरेदीस नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:29 PM