शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

५० टक्के शेतकऱ्यांकडे माल शिल्लक असताना सीसीआयने थांबविली खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 12:13 PM

महिनाभरात दुसऱ्यांदा थांबविली खरेदी : कापसाच्या विक्रीवर ‘कोरोना’ची संक्रात कायम

जळगाव : शेतकºयांकडे एकीकडे ५० टक्के माल शिल्लक असताना सीसीआय ने शनिवारपासून खरेदी थांबविली आहे. महिनाभरातच सीसीआयने दुसºयांदा खरेदी थांबवली असल्याने कापूस उत्पादक शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खासगी खरेदी केंद्रावर शेतकºयांचा माालाला भाव मिळत नाही तर शासकीय खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खान्देशात कापसाची लागवड १० ते २० टक्क्यांनी अधिक झाली होती. डिसेंबरमध्ये खरेदी केंद्र सुरु झाल्यानंतर कापसात ओलावा असल्याने बहूतेक शेतकºयांनी आपला माल विक्रीसाठी बाजारात आणला नाही. त्यानंतर संक्रातीनंतर बाजारात तेजी येईल व भाव वाढतील ही आशा देखील फोल ठरल्याने शेतकºयांनी फेब्रुवारी मध्यापर्यंत कापूस विक्रीसाठी आणलाच नाही. मात्र, आता भाव वाढीची आशा मावळल्याने शेतकºयांकडून कापूस खरेदी केंद्रावर माल आणला जात असताना दुसरीकडे सीसीआयने खरेदी थांबविल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून, सीसीआयने पुन्हा केंद्र सुुरु न केल्यास कमी भावात शेतकºयांना आपला माल विक्री करावा लागणार आहे.माल ठेवण्यास जागा नसल्याने खरेदी थांबवलीसीसीआयने देशभरात १ लाख गाठी खरेदी करण्याचे उदिष्ठ ठेवले आहे. आतापर्यंत ७० लाख गाठींची खरेदी सीसीआयने केली आहे. सीसीआयने १५ मार्चपर्यंत खरेदी थांबविल्याचे सांगितले जात आहे. सीसीआयच्या गोडावून मध्ये माल ठेवण्यासाठी जागा नसल्याने तात्पुरती खरेदी थांबविण्यात आली असल्याची माहिती प्रदीप जैन यांनी दिली. दरम्यान, सीसीआयच्या अध्यक्ष पी.अलीराणी यांनी एका कार्यक्रमात दिलेल्या यंदा सप्टेंबरपर्यंत खरेदी सुरु राहील अशी माहिंती दिली.दरम्यान, सीसीआयने खरेदी थांबवली असली तरी पणन महासंघाकडून खरेदी सुरु आहे. तर खासगी खरेदी केंद्रावर खरेदी सुरु असली त्याठिकाणी भाव कमी मिळत आहे.शेतकºयांचा मालाला आता कमी भाव भेटत असला तरी शासकीय खरेदी बंद झाल्याने खासगी केंद्रावर कापसाने भरलेल्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.देशभरातून ८० लाख तर खान्देशात १२ लाख गाठींची खरेदीसीसीआय व खासगी जिनींग मिळून २९ फेब्रुवारीपर्यंत देशभरात एकूण ८० लाख गाठींची खरेदी झाली आहे. तर खान्देशात १२ लाख गाठींची खरेदी झाल्याची माहिती खान्देश जिनींग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन यांनी ‘लोकमत’ ला दिली. खान्देशात दरवर्षी १५ ते १६ लाख गाठींची खरेदी होत असते. मात्र, यंदा कापसाची लागवड जास्त असल्याने यंदा २० लाख गाठी खरेदी होण्याचा अंदाज आहे.कोरोनामुळे कापूस बाजारावर संक्रात-चीन मध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारताहून चीनला जाणारा माल पुर्णपणे थांबला आहे. आता भारतापाठोपाठ अमेरिकेनेही चीन मधील निर्यात थांबविली आहे. त्यामुळे आंतराराष्टÑीय बाजारावर परिणाम झाला आहे.-कापसाचा जागतिक भाव ठरविणाºया न्युयॉर्क ट्रेडमध्ये सेंट चा भाव ७० वरून ६१ वर आला आहे.-त्यामुळे खंडीच्या भावातही मोठी घट झाली आहे. आठवडाभरापुर्वी ३९ हजार भाव असलेल्या खंडीचे भाव ३७ हजारवर आले आहेत. सरकीच्या भावातही चारशे रुपयांची घट झाली आहे.सीसीआयने खरेदी तात्पुरती थांबवली आहे. सीसीआयच्या गोडावूनमध्ये माल ठेवण्यास जागा उपलब्ध नाही. त्यामुळे काही दिवस खरेदी थांबविली असावी. मात्र, सीसीआयच्या अध्यक्षा पी.अलीराणी यांनी सप्टेंंबरपर्यंत खरेदी केंद्र सुरु राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने शेतकºयांनी घाबरण्याची गरज नाही.-प्रदीप जैन, अध्यक्ष,खान्देश जिनींग असोसिएशनकोरोना व्हायरसचा कापूस बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. खंडी, सरकीच्या भावातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. भविष्यातही हीच स्थिती कायम राहिल्यास खासगी जिनर्सला माल जास्त भावात खरेदी करणे परवडणारे नाही. यामुळे शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो.-हर्षल नारखेडे, जिनर्स व कापूस बाजाराचे तज्ज्ञ

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव