यामध्ये मू.जे. महाविद्यालय चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, मातोश्री आनंदाश्रमातील जेष्ठ व्यक्तींसाठी वॉटर कुलर आणि रिमांड होममधील मुलींसाठी शिलाई मशिन, ५० चटई, २०० सॅनिटरी पॅडस्, २०० मास्क, ऑक्सिमीटर आणि डिजिटल टॅम्परेंचर मीटर आदी साहित्याचे वितरण करण्यात आले.
रोटरी वेस्टतर्फे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासकीय नियमानुसार ५० रिक्षांना चालक व प्रवाशांमधील जागेत पारदर्शक पडदे लावण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष तुषार चित्ते, सचिव केकल पटेल, डॉ.राजेश पाटील, सहप्रांतपाल योगेश भोळे, कुमार वाणी, अनुप असावा, सुनील सुखवाणी, विवेक काबरा, सागर पाटील, सुदाम वाणी, महेश सोनी, दिग्विजय पाटील, प्रवीण जाधव, रामानंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बडगुजर, मातोश्री आनंदाश्रमाचे सहप्रमुख संजय काळे, सागर येवले, सुधारगृहाच्या अधीक्षिका जयश्री पाटील आदी उपस्थित होते.