जळगाव- फटाक्यांच्या आवाजामुळे व धुरामुळे मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम तर होतोचं, परंतु कधी-कधी दिवाळी फटाके प्राण्यांच्या जीवावरही बेतले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी आणि पशू-पक्ष्यांच्या रक्षणासह सुदृध मानवी आरोग्यासाठी ‘फटाकेमुक्त दिवाळी’ साजरी करावी, असा संदेश पशू अॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनच्या सदस्यांनी शनिवारी आकाशवाणी चौकात जनजागृती मोहिम राबवून दिला.
दिल लगाओ..तीली नहीगो ग्रीन.., दिल लगाओ..तीली नही...फटाकेमुक्त दिवाळी साजरा करा, प्राण्यांजवळ फटाके फोडू नका...यासह विविध घोषवाक्य लिहीलेली फलके हातात घेवून पशू अॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनच्या सदस्यांनी शनिवारी सकाळी १० वाजता आकाशवाणी चौकात फटाकेमुक्त दिवाळी जनजागृती मोहिम राबविण्यास सुरूवात केली. यावेळी असोसिएशनच्या सदस्यांनी आकाशवाणी चौकातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना फटाक्यांमुळे होणा-या दुष्पपरिणामांची माहिती दिली. तर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचाही संकल्पही करून घेतला. दोन तास ही मोहिम राबविण्यात आली. नागरिकांचा या मोहिमेला प्रतिसाद मिळाला.मोहिमेत यांचा होता सहभागया मोहिमेमध्ये पशू अॅनिमल प्रोटेक्शन असोसिएशनच्या संस्थापिका खूशबू श्रीश्रीमाळ, कोमल श्रीश्रीमाळ, गौरव श्रीश्रीमाळ, अमोल अग्रवाल, सौरभ नाथानी, अनिश शेवळे, राहुल थोरानी, अभिषेक मनोरे, अमल गुर्जर, नीर जैन, अभिषेक झंवर, अमृता आदी सदस्यांचा सहभाग होता. दरम्यान, अधिक आवाजातील फटाके फोडल्यामुळे कानठळ्या बसतात. त्यामुळे बहिरेपण येण्याची शक्यता असते. फटाक्यांच्या आवाजामुळेही प्राण्यांवर परिणाम होता. त्यामुळे कमी आवाजातील फटाके फोडावेत असाही संदेश असोसिएशनच्या सदस्यांनी दिला.