शासन परिपत्रकानुसार सार्वजनिक गणपती मंडळाने पोलीस, महापालिका, स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. कोविड -१९ संदर्भात उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मर्यादित मंडप उभारावा. भपकेबाज सजावट करू नका, सार्वजनिक मंडळाकरिता चार फूट व घरगुती गणपती बसविण्यात २ फूट उंचीच्याच मूर्ती बसविण्यास परवानगी आहे. यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू/संगमवर मूर्तीचे पूजन करावे. नजीकच्या कृत्रिम स्थळी विसर्जन करावे. उत्सवाकरिता देणगी स्वेच्छेने दिल्यास स्वीकारावी. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित करू नये. आरोग्य विषयक शिबिरे (रक्तदान) आयोजित करावी. स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करावे. आरती, भजन, कीर्तन, अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, ध्वनी प्रदूषण होणार नाही याचे पालन करावे. गणेश दर्शनाची सुविधा ऑनलाइन केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी द्वारे व्यवस्था करावी. फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. गणपती आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये. लहान मुले, वरिष्ठ नागरिक यांनी विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. एकत्रित मिरवणुकीस परवानगी नाही, कृत्रिम तलावात विसर्जन करावे. शासनाने ठरवून दिलेल्या अटी-नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे मार्गदर्शन केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव व बकरी ईद निर्बंधात साजरे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:19 AM