जळगाव : हनुमान दत्त मंदिर आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित रक्तकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर झाले. या रक्तदान शिबिरात ५० हनुमान भक्तांनी रक्तदान केले.
दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून हनुमान जयंती उत्सव साजरा केला जातो, परंतु कोरोना काळात रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवू नये या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सोबतच पाच दात्यांनी ही प्लाझ्मा दानासाठी ही पुढाकार घेतला.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक डाॅ. प्रवीण मुंढे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डाॅ. प्रसन्नकुमार रेदासनी, विजय जोशी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी बंटी काबरा, योगेश निकुंभ, महेश शिंपी, नितीन दुसाने, महेश सोनार, विजय सोनी यांनी परिश्रम घेतले. रेडक्रॉस रक्तकेंद्राच्या वतीने रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अनिल चौधरी, जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा, तंत्रज्ञ दीक्षा पाटील, किरण बावस्कर यांनी मेहनत घेतली.