न्हावी, ता.यावल : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भारत विद्यालयाच्या प्राथमिक शाळेत पत्रकार दिनानिमित्त शाळेत निबंध स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन पी.एच.महाजन होते. विद्यार्थ्यांना आचार्य जांभेकर यांच्या जीवनाविषयी माहिती सांगून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे, पत्रकारिता हे निष्ठेने आचरण्याचे व्रत आहे. पत्रकारितेसमोर इलेक्ट्रॉनिक मीडियाची आव्हाने उभी ठाकली असून, बदलत्या काळानुरुप टेक्नोसॅव्ही, कौशल्ययुक्त पत्रकार हवे आहेत. मोबाईल हा भरवशाचा ‘सखा’ बनला आहे. लोककल्याणाचे काम पत्रकार करीत असतात, त्यांनी विश्वासाला तडा जाऊ देता कामा नये ,असे सांगितले. चेअरमन महाजन यांनी पत्रकार कसा असावा? याबद्दल माहिती विशद करुन समाजाला दिशा व एक संदेश देण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी निबंध स्पर्धा स्पर्धा घेण्यात आली. यात दोन गट पाडण्यात आले होते. प्रथम गट पाचवी ते सातवी आणि व दुसरा गट आठवी ते दहावी असे गट होते. यात विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास रवींद्र कोलते, संजय बारी, संतोष बारी, पी.के. चौधरी व संचालक वामन नेहते, डॉ.के.जी.पाटील, शिक्षक, मुख्याध्यापक तिलोत्तमा चौधरी, कांचन राणे हजर होते. तसेच न्हावी येथिल ग्रामपंचायतीत पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला सरपंच भारती चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य उमेश बेंडाळे, रवींद्र तायडे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर जयंकर व कर्मचारी उपस्थित होते.
न्हावी येथे निबंध स्पर्धा व वृक्षारोपण करून पत्रकार दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 3:56 PM