जळगाव- शहरातील वर्धमान युनिव्हर्स सीबीएसई स्कूलमध्ये सोमवारी ओझोन डे साजरा करण्यात आला़यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सायकल रॅली काढून करण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन शाळेचे संस्थापक नरेंद्र मोदी व शाळेचे मुख्याध्यापक डॉ.आशिष अजमेरा तसेच ललिता अग्रवाल व डॉ. विनिता खडसे या मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत सर्व मुलांच्या हातात झाडे लावा, झाडे जगवा, जल है तो जीवन है असे आदी विविध प्रकारचे फलक घेऊन संपुर्ण परिसरात जाऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती केली़ तसेच ही रॅली वर्धमान स्कुल परिसरातून आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, ओंकारेश्वर मंदीर, रिंग रोड व तसेच स्टेडीयम परीसर मार्गे नवीन बस स्थानकापर्यंत काढण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.आशिष अजमेरासर यांनी ओझोन डे चे महत्त्व आपल्या भाषणाद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. या रॅलीत इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला़
वर्धमान स्कूलमध्ये ओझोन डे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:10 AM