जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शुक्रवारी राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे होते. तर रासेयोचे विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने, विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी नरेंद्र पाटील, आकाश धनगर, रोहन अवचारे, प्रशिक तायडे, प्रविण शिंदे, सागर महाजन, तुषार महाजन, अक्षय महाजन, माधव पाटील, प्रेम वाकडे, विजय बिऱ्हाडे, आकाश भामरे, गंजिधर पाटील, कैलास औटी, कृष्णा लांडगे, प्रकाश चौरे, चंदन मोरे, जगदिश शिवदे आदींसह रासेयोचे आजी व माजी स्वयंसेवक उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रफुल्ल मेढे यांनी केले. जयेश सांळुखे यांनी आभार मानले.