शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

वराडसीम येथे पारंपरिक मात्र वैशिष्ट्यपूर्ण बैलपोळा उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 7:36 PM

दोन बाय तीन फुटांच्या खिडकीतून उडी मारली बैलाने, बैलाच्या धडकेत शेतकऱ्यासह दोन जण जखमी

उत्तम काळे/भास्कर सोनारभुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील पारंपरिक तसेच वैशिष्ट्यपूर्ण ठरणाºया पोळ्याच्या सणानिमित्त जोगलखोरी येथील गजानन सुरेश पाटील यांच्या बैलाने गाव दरवाजाच्या अडीच बाय तीन फुटांच्या खिडकीतून उडी घेऊन पोळा फोडण्याचा मान मिळवला आहे. या वेळी पोळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक व गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते .दुपारी तीन वाजता पोलीस पाटील सचिन वायकोळे, माजी सरपंच विलास पाटील, प्रशांत खाचणे, सुभाष कोळी, मनोज कोल्हे, सुनसगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.पी. सपकाळे, गोपाळ पढार, प्रकाश जोहरे, कैलास सपकाळे, कैलास कोल्हे, मंगेश डोळसे, संजय डाके, किशोर डाके, दिगंबर वाणी, निवृत्ती मावळे, संतोष सावळे, कृष्णा पाचपांडे, तलाठी पवन नवगाळे , भिका पाटील आदींनी दरवाजा बंद केला. त्यानंतर अडीच बाय तीन फुटाची खिडकी उघडली. या खिडकीतून जोगलखोरी येथील पाटील यांच्या बैलाने प्रथम प्रवेश करून बैल फोडण्याचा मान मिळवला तर द्वितीय क्रमांक शुभम शांताराम जंगले व तृतीय क्रमांक समाधान देशमुख यांच्या बैलांनी पटकावला.सरपंचांच्या हस्ते झाले मानाच्या बैलाचे पूजनसरपंच गीता प्रशांत खाचणे यांच्या हस्ते मानाच्या बैलांची पूजन करण्यात आले. या वेळी बैल मालकांना १०१ रुपया व नारळ देण्यात आले. प्रसंगी उपसरपंच प्रीती संजय डाके, ग्रामपंचायत सदस्य ज्योत्स्ना विलास पाटील, प्रतिभा जंगले, सदस्य प्रकाश ठाकूर आदी उपस्थित होते.नारायण पाटील यांच्या नावाने बसवला आहे दरवाजानारायण राघो पाटील यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे त्यांनी ३५० ते ४०० वर्षांपूूर्वी हा दरवाजा बसला आहे. त्यावेळी गावात कोणीही प्रवेश केला तरी त्याची प्रथम खिडकीमधून चौकशी करण्यात येत होती. त्यानंतरच त्याला खिडकीद्वारे प्रवेश देण्यात येत होता. कालांतराने दरवाजा उघडा करण्यात आला. मात्र केवळ पोळ्याच्या दिवशी हा दरवाजा बंद करून व खिडकी उघडून केवळ बैलपोळा फोडण्याची परंपरा सुरू करण्यात आली. ती परंपरा अद्यापही सुरू आहे.दरम्यान, पोळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांसह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पोळा फुटण्याच्या वेळेस तर तोबा गर्दी झाली होती.बैलाच्या धडकेत एक जखमीदरम्यान, पोळा फोडण्यापूर्वी तब्बल एक ते दीड तास दरवाजाच्या बाहेर बैलांना खिडकीतून उडी मारण्यासाठी शेतकरी बैलांची बसस्थानकापासून धावत आणत दौंड लावत होते. यामध्ये सुनील पाचपांडे या तरूण शेतकºयाला बैलाने शिंगाने मारल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी भुसावळ येथे नेण्यात आल्याचे उपस्थितांमधून सांगण्यात आले.१०० पोलिसांनी ठेवला बंदोबस्ततालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक निशिकांत जोशी व गजानन कोंडवाल, एएसआय अरुण जाधव पो.कॉ. हर्षवर्धन सपकाळे यांच्यासह तालुका व बाजारपेठेचे पोलीस कर्मचारी, आरसीबी प्ल्याटून, कॅमेरा व्हेन तैनात करण्यात आली होती. तब्बल १०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित असल्याचे पोलीस निरीक्षक कुंभार यांनी सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकBhusawalभुसावळ