पदोन्नती करण्याची मागणी
जळगाव : महानगर पालिकेत वर्ग ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांच्या २०१० पासून कालबद्ध पदोन्नत्या झाल्या नसून ते आश्वासित प्रगती योजनेपासून वंचित आहेत. लवकर त्यांना पदोन्नत्या मिळाव्यात, अशी मागणी शहीद भगतसिंग मनपा कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे. अध्यक्ष अनिल नाटेकर यांनी हे निवेदन दिले आहे.
काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर
जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले. गेंदालाल मिल परिसरात हे शिबिर झाले. काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेड महानगर प्रमुख गोकूळ चव्हाण यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यासह पर्यावरणदिनी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी नीलेश भोसले, नितीन चंदनशिव, बापू गुजर, विलास निकम, राहुल वाघ, सुनील एकशिंगे, सागर चव्हाण, दिलीप सुरवाडे, शांताराम भारूळे, भूषण जाधव, नितीन सिसोदिया आदी उपस्थित होते.