जळगाव : सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे मोहरम सण घरीच साजरा करण्यात आला. सकाळी मोहरम व यौमे आशुरा या दिवशी करायच्या नमाज-ए-आशुरा, दुआ-ए- आशुरा, फातेहा खानी, सलातो सलाम आदी सर्व इबादत आपापल्या घरीच केले. तसेच लंगर नियाज व सबिल सार्वजनिक व मोठ्या प्रमाणात न करता घरच्या सदस्यांपुरते बनवून लाभ घेण्यात आला.मोहरमच्या संपूर्ण सलाब दहा दिवस संपूर्ण जगात मुस्लिम बांधव विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यामुळे सुन्नी पंथीयांचे जिल्हास्तरीय मरकज सुन्नी जामा मस्जिद नियामतपुरातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना मोहरम व यौमे आशूराच्या सर्व इबादत (धार्मिक विधी) हे घरातच साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सुन्नी बांधवांनी आपापल्या घरीच मोहरम साजरा केला.मोहरम साजरा होण्यासाठी सुन्नी जामा मस्जिद नियामतपुरा व सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा, मौलाना नजमूल हक, मौलाना अब्दुल माजिद, मौलाना मोइनुद्दिन वास्ती, मौलाना मुबारक अली, इक्बाल वजीर, मुक्तार शहा यांनी परिश्रम घेतले.
मुस्लीम बांधवांतर्फे मोहरम साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 11:12 AM