यावल, जि.जळगाव : राज्यात केवळ यावल येथेच साजरा होत असलेला पेहरन-ए-शरीफ उत्सवाच्या मिरवणुकीस येथील डांगपुरा भागातून मंगळवारी सायंकाळी वाद्यवृंदाच्या गजरात धार्मिक गीतासह उत्साहात सुरवात झाली. खिर्नीरुा भागात रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता होणार आहे.या वर्षी डांगपुरा उत्सवाचे आयोजन डांगपुरा समितीच्या वतीने करण्यात आले आहे. उत्सवास राज्यभरातून समाज बांधव येथे आले आहेत. प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची वर्दळ आहे. शहर हिरव्या पताकांनी सजले आहे. दुकानांवर रोषणाई करण्यात आली आहे.येथील पेहरन-ए-शारीफ उत्सवास सुमारे १०० वर्षाहून अधिक वर्षांची परंपरा आहे. राज्यात हा उत्सव यावल येथे साजरा होत असल्याने येथील मुस्लीम बांधवांचे लांबचे नातेवाईक या उत्सवासाठी येत असल्याने शहरास यात्रेचे स्वरूप आले आहे.उर्दू वर्षानुसार मोहरमच्या १४ तारखेस दरवर्षी येथे हा उत्सव साजरा करण्यात येतो. शहरातील खिर्नीपुरा, बाबूजीपुरा आणि डांगपुरा या तीन मोहल्ल्याच्या वतीने चक्र पद्धतीने उत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव डांगपुरा समीतीच्या वतीने आहे.उत्सवानिमित्ताने येथील सुदर्शन सिनेमा टॉकीज परिसर, बुरूज चौक परिसरात विविध दुकाने थाटली आहेत.सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत दुकानांवर गर्दी झाली होती. डांगपुरा उत्सव समितीसह, समाजबांधव व हिंदूबांधवांनी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.पोलीस निरीक्षक डी. के. परदेशी व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शांततव समिती सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.राज्यासह बºहाणपूर, खंडवा येथून मल्ल येणार असल्याची माहिती आयोजन समितीने दिली.
यावल येथे पेहरन-ए-शरीफ उत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:57 AM
राज्यभरातील भाविकांची हजेरी, शहराला आले यात्रेचे स्वरूप
ठळक मुद्देदरवर्षीप्रमाणे दुसºया दिवशी कुस्तीचा आमदंगल भरवण्याची प्रथा आहे. त्यानुसार येथील हडकाई नदीपात्रात बुधवारी दुपारी कुस्त्यांची आम दंगल आयोजित करण्यात आली आहे.