जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रिसदस्यीय केंद्रीय समिती रविवारी जळगावात आली असून सकाळी या समितीने कौतिक नगर तसेच इतर भागात प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, इन्सिडेंट कमांडर गोरक्ष गाडीलकर, मनपा आयुक्त डॉ. सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा ही समिती घेणार आहे़ यात समितीत डॉ. अरविंदसिंग खुशवाह, डॉ. बॅनर्जी आणि सचिव कुणालकुमार यांचा समावेश आहे.
केंद्रीय समितीकडून जळगाव शहरात ठिकठिकाणी पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 12:58 PM