एरंडोल/ पारोळा: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय समिती २२ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत धुळे जिल्ह्यातील पाहणी आटोपून जळगाव जिल्ह्यात दाखल होणार होणार होती मात्र मालेगाव येथेच विलंब लागल्याने समितीचा दौरा लांबला. पारोळा येथे पोहचता पोहचता सायंकाळ झाल्याने मोंढाळे येथील पाहणी नावापुरता अंधारातच झाली तर इतर सर्व ठिकाणी पाहणी न करताच अधिकारी रवाना झाले. यामुळे प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.पारोळा तालुक्यातील मोंढाळे, करंजी बुद्रुक, सावखेडे मराठे तसेच एरंडोल तालुक्यातील भालगाव, एरंडोल, पिंपळकोठा या गावांना समिती शुक्रवारी भेट देणार होती. पैकी मोंढाळे येथेच एका शेतात पाहणी केली.या केंद्रीय पथकात केंद्रीय अर्थमंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिनानाथ व जयपुर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाष चंद्रा, नाश्किा विभागीय आयुक्त राजाराम माने, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, प्रांतअधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, प्रभारी कृषी अधिकारी सुरेश खेताडे व कृषीसहाय्यक व मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.यावेळी मोंढाळे प्र अ.येथील शेतकरी भाऊलाल विठ्ठल पाटील यांचे कपाशी शेताताचे नुकसान न पाहता केंद्रीय समितीने हिरमोड केला.केंद्रीय पथक हे आपल्या आठ ते दहा गाड्यांचा ताफा घेऊन आले. सुटाबुटात आलेले अधिकारी यांनी नावाला एकच प्रातिनिधीक स्वरुपात म्हणणे ऐकुन महामार्गावर काढता पाय घेतला. अनेक शेतऱ्यांना आपल्या व्यथा मांडायच्या होत्या परंतु या पथकाने लक्ष दिले नाही.यावेळी मोंढाळे प्र अ सरपंच महारु पाटोळे , नंदलाल पाटील, सुधाकर पाटील, बळीराम पाटील, सतीश पाटील, किशोर पाटील, नंदू पाटील, विठ्ठल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान भेटच न दिल्याने करंजी येथील नुकसान ग्रस्त शेतकरी रविंद्र रामचंद्र पाटील,गोरख माळी व सावरखेड मराठ येथील शेतकरी राधेश्याम तोताराम नारायणी यांच्या पदरी घोर निराशा पडली.एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्यावर तसेच एरंडोल नजीक अंजनी धरण फाट्यावर व पिंपळकोठा या तीन ठिकाणी केंद्रीय पथक पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार होते परंतु पथक या तिन्ही ठिकाणी न थांबता सरळ राष्ट्रीय महामार्गाने निघून गेल्यामुळे शेतकºयांची मोठी निराशा झाली. संध्याकाळी सव्वासात वाजता पथकाच्या वाहनांचा ताफा भालगाव फाट्यावरुन सरळ निघून गेला त्यावेळी त्याठिकाणी तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पोलीस निरीक्षक अरुण हजारे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, मंडळ कृषी अधिकारी एस.टी. पाटील व शेळगावकर, महसूल मंडळ अधिकारी एस. आर. महाले कृषी सहाय्यक महाजन, तलाठी ठोंबरे व सुमारे ५० शेतकरी केंद्रीय पथकाची प्रतीक्षा करीत थांबले होते. तसेच भालगाव येथील घनश्याम बिर्ला यांच्या कपाशीच्या शेतावर पथक येणार असल्यामुळे तेथेही अनेक शेतकरी थांबले होते. पथक आमच्याशी संवाद साधेल व आमची व्यथा ऐकून घेईल या आशेवर थांबलेले शेतकरी निराश झाले. एरंडोल येथे गोदावरीबाई परदेशी यांच्या शेतात ज्वारी पिकाचे व पिंपळकोठा येथे नलिनी रघुवंशी यांच्या शेतात ज्वारी पिकाची केंद्रीय पथक पाहणी करणार होते.पाहणी न करता अहवला देणार कसा ?मोंढाळे येथे सायंकाळी साडेसहा वाजता पथक आले. यावेळी पथकाने शेतात प्रत्यक्ष पाहणी न करता रस्त्यावरच शेतकºयांची विचारपूस करीत अवघ्या तीन तीन -चार मिनिटांची धावती भेट घेतल्याने केंद्रीय पथक नेमका तालुक्याचा बाबतीत कसा अहवाल देणार हा याबाबत शेतकरी चिंतातुर अवस्थेत दिसुन आले.
केंद्रीय समितीने केला हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 9:22 PM