शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

बोदवड येथे मोहरमनिमित्त सवाऱ्याची शतकी परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 9:13 PM

हिंदूंच्या १२०, तर मुस्लीम बांधवांच्या ८० सवाºया

ठळक मुद्देदोनशेवर सवाºया बसतात शहरात ठिकठिकाणीबोदवड शहरात उच्च शिक्षित भगत मंडळी१८ रोजी मिरवणूक, २० रोजी कत्तलची रात्र, तर २१ रोजी ताजिया मिरवणुकीने उत्सवाचा समारोपचार दिवसात होते लाखोंची उलाढाल

बोदवड, जि.जळगाव : मुस्लीम बांधवांच्या मोहरम महिन्याची सात तारीख अर्थात १८ सप्टेंबरपासून मोहरम सणाला सुरुवात होत आहे. चार दिवसीय शतकी परंपरा असलेल्या मोहरमच्या सवाºया बसवण्याची बोदवड येथे परंपरा आहे. या सवाºया म्हणजेच (छडी) सजवलेल्या छडी ह्या शहरात ठिकठिकाणी सजवलेल्या मांडवात बसवलेल्या असतात. त्या छडीला चांदीचा नाल, चांदीची छत्री, कापडाची चादर, फुलांच्या झालरने सजवून चौरंगवर बसवलेले असते.अभिर, अत्तर, लोभानच्या सुगंधाने हा परिसर सुवासिक झालेला असतो, तर बसवलेल्या सवाºयांची मिरवणूक त्यांची मिरवणूक सवाद्य भगत मंडळी एकत्र दोन चारच्या संख्येने एकत्र येऊन सवाद्य शहरातून काढतात. मोहरमनिमित्त बसवण्यात येणाºया सवाºयांची मिरवणूक पाहण्यासाठी बोदवडसह खान्देश, विदर्भ व मध्य प्रदेशातील बºहाणपूर, सुरत, मलकापूर, मुंबई येथील भाविक येत असतात. यासाठी या चार दिवसात शहरात जणू जत्राच भरलेली असते.मोहरमनिमित्त बसणाºया सवाºयाची भाविकांमध्ये श्रद्धा आहे. अनेक भाविक नवस मानतात व नवस फेडण्यासाठी चांदीचा नाल, खोपरा वाटी तसेच चादर, अत्तर, फुल, लोभान, अभिर या वस्तू चढवत असतात. त्यामळे या वस्तूची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. यासाठी शेकडो टन फुल विक्रीसाठी बोदवड शहरात येत असतात. यासाठी बाजारपेठ सजलेली असते. या वस्तूंमुळे कापड व्यावसायिक, फुलहार विक्रेते याना रोजगार मिळतो. सुमारे दोनशे सवाºयांमागे वाजंत्री मंडळी असा एक सवारी (छडी) मागे भगत मंडळींसह १५ जणांचा गोतावळा असतो.१८ रोजी या सवाºया बसवल्या जातात. चार दिवस चालणाºया या उत्सवात १८ रोजी मिरवणूक, २० रोजी कत्तलची रात्र, तर २१ रोजी ताजिया मिरवणुकीने उत्सवाचा समारोप होईल.बोदवड शहरात बसणाºया सवाºयांची रीतसर नोंदणी पोलीस प्रशासन करते. गत वर्षी शासकीय आकडेवारीनुसार १६० सवाºया बसवण्यात आल्या होत्या. त्यात सर्वाधिक शंभर सवाºया ह्या हिंदू बांधवांच्या होत्या.शहरात ठिकठिकाणी मांडव करून बसविण्यात येणाºया सवाºयांच्या भगत मंडळींमध्ये काही वकील, तर काही शिक्षक तर काही शासकीय नोकरदार भगत आहे.काही मानाच्या सवाºया व त्यांचे भगतसलाम भगत (दुले कासम), भास्कर भगत (सिद्धी चांदशा वली) गोपाल गुरुजी (सिद्धी मस्तान वली) मनोहर भगत कंडक्टर (दिलेर चांदशा), बुना भगत (कमल शावली) सुरज भगत, नाना भगत, अमीर भगत,जगू भगत, सुभान भगत, बुºहानोद्दीन वली, गजू भगत, अमृत भगत, नईम शा, आकाश भगत, राहुल भगत, सैलानी पीर, गुलाबशा असे भगत आहेत.१८ पासून संदल मिरवणुकीने या उत्सवाला सुरवात होत आहे. गणेशोत्सव व मोहरमच्या सवाºयानिमित शहरात पाहुणे मंडळींची गर्दी होत असते, तर सवाºयांची मिरवणूक पाहण्यासाठी रस्ते चौक गजबजलेले असतात. या चार दिवसात लाखोंची उलाढाल होत असते. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBodwadबोदवड