चोपडा : तालुक्यात यावर्षी संकरित कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यासोबतच उडीद, मूग, चवळी या खरीप पिकांची लागवडही बऱ्यापैकी झालेली होती. मात्र यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने संकरित कापसासह या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकरी दुसरा हंगाम चांगला येईल, या आशेवर आहेत.तालुक्यात जवळपास ६५ हजार हेक्टर जमीन पीक पेरण्यालायक असून त्यापैकी जवळपास ४० हजार हेक्टर जमिनीवर शेतकऱ्यांनी संकरित कापसाची लागवड केली होती. यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने मे आणि जून महिन्यात लागवड केलेल्या संकरित कापसाचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे.कापूस पिकाची स्थिती चांगली असताना सतत दोन महिने पाऊस झाल्याने शेतात पाणी दार्घकाळ साचून राहिलेयाने कापसाला लागलेल्या सर्व कैºया मात्र सडून गेल्या. नवीन फुले व फुगडी येणेही बंद झाले. त्यामुळे संकरित कापसाचे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ज्या शेतकºयांनी जून महिनाअखेर व जुलै महिन्यात संकरित कापसाची लागवड केलेली होती अशा शेतकºयांचा संकरित कापूस बहारदार असून त्यांना उत्पन्न चांगले येण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाणीटंचाईची भीती निवारली आहे. सततच्या भिजपावसामुळे मात्र बहुसंख्य शेतकरी उत्पन्न घटल्याने चिंतातूर आहेत.
उडीद व मुगाचे अत्यल्प उत्पन्नकोरडवाहू शेती असलेल्या शेतकऱ्यांनी मूग, उडीद, चवळी, तूर या पिकांची पेऱणी केली होती. मात्र बराच काळ सूर्यप्रकाश न मिळाल्याने ही सर्व पिके सडून वाया गेली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद आणि मूग विक्रीसाठी येण्याचे प्रमाण नगण्य आहे आणि आलाच तर त्यात उडीद आणि मूग डामा लागलेला किंवा पाण्याने खराब झालेला असा विक्रीसाठी येत आहे.