चोपडा : तालुक्यातील चहार्डी येथील रहिवासी सुधीर पाटील यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना २५ रोजी रात्री ११.४५ वाजता घडली. या आगीत पाटील यांचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान, पाटील यांच्या घराच्या शेजारीच असलेल्या घरात कापूस साठवलेला होता. तो मात्र आगीपासून बचावला.शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.चहार्डी येथील काळकाम पुऱ्यातील रहिवासी तथा शेतकरी सुधीर रमेश पाटील यांच्या घराला २५ रोजी गुरुवारी रात्री ११ : ४५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने लागलीच रौद्र रूप धारण केले. आगीत घरातील संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्य,कपाटातील महत्त्वाची कागद पत्र,कपडे शिवाय टीव्ही, कुलर, फ्रीज, पंखे आदी वस्तू व घराचे सर्व लाकडी खांबांसह धाब्याचे कडीपाट लाकूड जळून खाक झाले.पाटील यांचे धाब्याचे जुने लाकडी घर असल्याने आगीत सर्व काही भस्मसात होऊन राखरांगोळी झाली. आजच्या घडीला घरात कोणतीही वस्तू शिल्लक नाही. शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुधीर पाटील यांच्या घराला आग लागल्याचे गावात समजताच गल्लीतील रहिवासी व गावातील नागरिक मदतीला धावून आले. प्रसंगी ग्रामस्थांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु आगीचे स्वरूप भयानक असल्याने शेवटी चोपडा नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनी आग विझविण्यात यश आले तो पर्यंत संपूर्ण लाकडीघर व घरातील सर्वकाही वस्तूंची जळून राखरांगोळी झाली होती.
चहार्डीला आगीत घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 3:49 PM
चहार्डी येथील रहिवासी सुधीर पाटील यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.
ठळक मुद्देसुदैवाने जीवितहानी टळलीकाही कळायच्या आत संसाराची राखरांगोळीआगीत झाले दहा लाखांचे नुकसान