जळगाव : मित्राला भेटण्यासाठी आलेल्या खगेश दिलीप कोल्हे (वय 19,रा.जुना खेडी रोड, जळगाव) या हॉटेल मॅनजमेंटच्या विद्याथ्र्याला 8 ते 10 जणांनी बुधवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शाहू महाराज कॉम्प्लेक्सजवळ घेरून चाकूहल्ला करून बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जखमी जमिनीवर कोसळताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. भरदिवसा हा थरारक प्रकार घडत असताना खगेशच्या मदतीला जाण्याची हिंमत कोणीही दाखविली नाही. पूर्ववैमनस्यातून खगेश याच्यावर हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खगेश कोल्हे हा पुणे येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाला सुट्टी असल्याने तो जळगावात काही दिवसांपूर्वी घरी आला. धुलिवंदनाच्या दिवशी खगेश हा मित्रांसोबत रथचौकात आला होता. तेथे जैनाबाद येथील आठ ते दहा तरुण खगेश याच्या एका मित्राला शोधत त्या ठिकाणी आले होते. खगेशसोबत असलेल्या मित्राने काय झाले अशी विचारणा केली असता त्या तरुणांनी त्याला काहीही न सांगता मारहाण केली. यानंतर खगेशलाही बेदम मारहाण करून पळ काढला. काही वेळातच खगेशचे मित्र आल्यानंतर त्यांनी जैनाबाद येथे जाऊन त्या मारहाण करणा:यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नव्हते. सायंकाळी गुन्हा दाखलदरम्यान, खगेश कोल्हे या विद्याथ्र्यावर हल्ला झाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अजितसिंग देवरे यांनी दुपारी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब नोंदविला. त्यात त्याने जुन्या भांडणाचेच कारण सांगितले. त्याच्या फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला सायंकाळी कलम 326, 143, 147 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. हल्लेखोर फरारदरम्यान, हेडकॉन्स्टेबल भास्कर पाटील, महेंद्र बागुल, अल्ताफ पठाण यांनी जैनाबादमध्ये जाऊन हल्लेखोरांचा शोध घेतला, मात्र ते फरार झाले. हल्ल्याच्या ठिकाणी हजर असलेला कोल्हे याचा मित्र वैभव पाटील याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते.या टवाळखोरांकडून शाहू नगर परिसरात सतत दहशत माजविली जात असून महिला व मुलींना पाहून या टोळक्याकडून अश्लिल शेरेबाजी केली जात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.फिल्मीस्टाईल घातला वेढाखगेश बुधवारी रात्री पुण्याला जाणार असल्याने तो सकाळी 11 वाजेच्या सुमारास मित्राला भेटण्यासाठी शाहू कॉम्प्लेक्सजवळ आला होता. दोघं मित्र गप्पा मारत असताना धुलिवंदनाच्या दिवशी मारहाण करणारे जैनाबाद येथील 8 ते 10 जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी खगेशला दुचाकीवरुन फिल्मीस्टाईल वेढले आणि काहीही न बोलता मारहाण करण्यास सुरुवात केली. साई नामक तरुणाने त्याच्या पोटावर चाकू हल्ला केला. हा प्रकार पाहून मित्राने तेथून पळ काढला. त्या ठिकाणाहून दुचाकीवरुन जात असलेल्या एकाने खगेशला रस्त्यावर जखमी अवस्थेत पाहून त्याने दुचाकीवरुन जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही वेळातच खगेशच्या आई-वडिलांनी तसेच मित्रांनी जिल्हा रुग्णालय गाठले. खगेश याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
फिल्मीस्टाईल घातला वेढा गजबजलेल्या रस्त्यात विद्याथ्र्यावर चाकूहल्ला
By admin | Published: March 16, 2017 12:05 AM