चाळीसगाव : तब्बल १० वर्ष बंद असलेला बेलगंगा साखर कारखाना लोकसहभागातून भूमीपुत्रांनी विकत घेतला. यामुळे तो सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गतवर्षाप्रमाणे यंदाही बेलगंगेचा गळीत हंगाम घेतला जाणार नाही. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील यांनी 'लोकमत'शी बोलतांना दिली.२०१८च्या आधी दहा वर्ष हा कारखाना बंद होता. त्याची मालकी जिल्हा बँकेंकडे होती. त्याचवेळी चित्रसेन पाटील यांनी हा कारखाना पुन्हा सुरु करण्यासाठी लोकसहभागाचा नारा दिला. त्याला तालुकाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. या चळवळीमुळे ४० कोटी रुपये उभे राहिले. कारखाना खरेदी - विक्रीची प्रक्रिया पार पडली.यानंतर कारखान्यात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली. पुन्हा तीस कोटी रुपये उभे राहिले. २०१९ मध्ये चाचणी हंगाम घेण्यात आली. यात ५५ हजार टन साखरेचे उत्पादन झाले. याचवेळी ऊसतोड मजुर व शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात आले. यावर्षी लॉकडाऊनमुळेही अडचणी आल्या. एका बॉयलरचे काम अपूर्ण होते. तो पावसाळ्यात पडूनही आला आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगामषा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दरम्यान कारखाना सुरु न झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असूृन कारखाना नियमीतपणे सुरु करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बेलगंगाचा यंदाही चक्काजामच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 5:16 PM