चाळीसगाव : मेवाड नरेश महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त रविवारी समाजिक उपक्रम राबविण्यात आले. राजपूत मंगल कार्यालयात आयोजित सोहळ्यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रतिमा पूजन झाले. रक्तदान शिबिरात ६० जणांनी रक्तदान केले. तलवारबाजीचे सादरीकरणही केले गेले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर पाळून जयंती सोहळा साजरा करण्यात आला. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास अडचणी येत आहे. यावर उपाय म्हणून महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. यावेळी ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. गरजूंना अन्नदान करण्यात आले. सकाळी नऊ वाजता वाजता पाटीलवाडास्थित जय बजरंग व्यायाम शाळेत माजी उपनगराध्यक्ष शिवाजी राजपूत यांचे हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उदघाटन चंपाबाई रामरतन कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनील राजपूत यांच्यासह जि.प.चे माजी सदस्य मंगेश पाटील यांचे हस्ते झाले. यावेळी पं.स.चे भाजपा गटनेते संजय पाटील, न.पा.चे भाजप गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सविता राजपूत, माजी नगरसेवक महेंद्र चंद्रसिंग पाटील, नानाभाऊ पवार, भाऊसाहेब जगताप, नितीन पाटील, सुचित्रा पाटील,निलेश राजपूत, प्रदीप राजपूत, दीपक परदेशी सुनील राजपूत आदी उपस्थित होते. ठाणसिंग पाटील, अरुणसिंग पाटील प्रवीण ठोके यांच्यासह जीवन सुरभी ब्लड बँकेचे डॉ. दत्ता भदाणे व त्यांची टीम, महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती, राष्ट्रीय राजपूत करणी सेना पदाधिकारी, महाराणा प्रताप मित्रमंडळ पाटीलवाडा, महाराणा प्रताप मित्रमंडळ जुने विमानतळ, महाराणा प्रताप मित्रमंडळ आदर्शनगर, राहुल पॉइंट जिद्दी ग्रुप, वैष्णव मित्रमंडळ, सिद्धिविनायक मंडळ धुळे रोड, यांनी सहकार्य केले. महाराणा प्रताप शौर्याचे प्रतिक - आ. चव्हाणमेवाड नरेश महाराणा प्रताप हे शौर्याचे प्रतिक असून, काळाच्या पटलावर ही अमीट मुद्रा उमटलेली आहे. त्यांनी आपल्या मातीवर मनापासून प्रेम करतांना समाजातील प्रत्येक घटकासाठी राज्य उभे केले. त्यांच्या शौर्याची मशाल अखंड तेवत राहील. असे प्रतिपादन आ. मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
यावेळी दिव्येश जयदीप गांगुर्डे याबालकाने चित्तथरारक तलवारबाजीचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. त्यांच्या चापल्याने उपस्थित भारावले.