चाळीसगाव दि: २ : चाळीसगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर काशिनाथ वाघ (वय ५२) यांनी आपल्या कार्यालयात विष प्राशन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.चाळीसगाव पंचायत समिती मध्ये गाजत असलेल्या जवाहर योजनेतील विंधन विहीरींमधील घोळ आणि मनरेगा कामातील अनियमितता यामुळे भाजपा - राष्ट्रवादी मध्ये आरोप- प्रत्यारोप होत आहे. बीडीओ वाघ यांना गेल्या महिन्यात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. तेव्हा पासून ते मानसिक तणावातही होते.गुरुवारी दुपारी एक वाजता पंचायत समितीच्या सभागृहात सभापती स्मितल दिनेश बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा सुरु होती. या दरम्यान बीडीओ वाघ हे आपल्या कक्षात बसले होते. थोड्या वेळाने ते बाथरुमला गेले. बाहेर आल्यानंतर त्यांनी विषारी द्रव्य सेवन केला. हा प्रकार शिपाई संजय शिंदे व बाजीराव दौंड यांनी सभागृहात येऊन सांगितल्याने सदस्यांची एकच धावपळ उडाली. दुपारी पावणे तीन वाजता त्यांना राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील, सुभाष पाटील यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. बीडीओ वाघ हे ३० आॅक्टोबर रुजू झाले होते. रुग्णालयात माजी आमदार राजीव देशमुख, दिनेश बोरसे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी त्यांची भेट घेतली.
चाळीसगाव बीडीओंनी कार्यालयातच केले विष प्राशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 5:26 PM
पंचायत समितीची मासिक सभा सुरु असताना झाली घटना
ठळक मुद्देबीडीओ यांना गेल्या महिन्यात पाठविले होते सक्तीच्या रजेवरविंधन विहिर व मनरेगा कामकाजावरून सुरु होते आरोपप्रत्यारोपकाही दिवसांपासून होते मानसिक तणावात