चाळीसगाव : गेल्या आठवड्यात धुळे रस्त्यावरील शिक्षक कॉलनीत जबरी दरोड्याची घटना घडली होती. ही घटना विस्मरणात जात नाही तोच शनिवारी पहाटे चोरट्यांनी भडगाव रस्त्यावरील घाटे कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलातील सात ते आठ दुकानांचे शटर उचकावून बराच माल लंपास केला आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. दरम्यान सायंकाळ पर्यंत गुन्हा दाखल न झाल्याने चोरीस गेलेल्या ऐवजाचा तपशील मिळू शकला नाही.याबाबत व्यापाºयांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री ही चोरी झाली असावी. चोरट्यांनी विनोद कुमावत यांचे जत्रा बिअर शॉपी या दुकानाचे कुलूप तोडून शटर उचकावले, तर सचिन तिवारी यांच्या व्यंकटेश अल्युमिनीअम ग्लास या चार गाळ्यांचे शटर उचकावले. सागर वरखेडे यांच्या मालकीच्या हॉटेल वृंदावन या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील गल्ल्यातील व बरणीतील सुमारे ११ हजार रूपयांची रोकड लंपास केली. मंगेश पाटे यांचे बाप्पा मोबाईल हे दुकानही फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. तर रविंद्र कुमावत यांच्या पप्पु पार्लर या दुकानाचे कुलप तोडण्यात आले.या दुकानांमधून किती रूपयांचा ऐवज चोरीस गेला हे समजून आले नाही. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांची गस्त वाढलेली असतांना देखील चोरट्यांनी हे धाडस केले.सीसीटीव्ही कॅमेरा... तोही बंदजी दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला त्यापैकी एकाच दुकानात सीसीटीव्ही कॅमरा आहे मात्र अनावधनाने तो कॅमेरा बंद होता. तर आणखी एका दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचे समजते. त्यावरून पोलीस चोरट्यांचा काही माग मिळतो हे पाहणी करीत आहेत.
चाळीसगाव येथे आठ दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 2:39 PM
व्यापाऱ्यांमध्ये घबराट
ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेरा बंद