चाळीसगाव : कोरोनाच्या दुस-या लाटेचा उत्पात सुरु असतांनाच एक मे महाराष्ट्रदिनी काहींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्याचा मुहूर्त साधत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हौतात्म पत्करलेल्यांना अभिवादनही केले. शनिवार पासून १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठीही लसीकरण सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी, त्याबाबत स्पष्ट सुचना नसल्याने यावयोगटातील कुणालाही लसीकरण करण्यात आलेले नाही. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी दिली.चाळीसगाव शहरात ट्रामा केअर सेंटर मध्ये तर ग्रामीण भागातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना शनिवारी प्रतिबंधक लसीकरण नेहमीप्रमाणे सुरु होते. मात्र काही नागरिकांनी महाराष्ट्रदिनी लस घेण्याचा योग मुद्दामहून साधला. यामुळे सकाळपासूनच धुळे रोडस्थित ट्रामा केअर सेंटर मध्ये लसीकरणासाठी गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील प्राथ. आरोग्य केंद्रांवरही लस घेणा-या नागरिकांची रांग लागली होती.रांजणगाव, पातोंडा, वाघळी, मेहुणबारे, शिरसगाव, खेडगाव आदि प्राथ. आरोग्य केंद्रांवर शनिवारी लसीकरण झाले. दुस-या लाटेचा प्रकोप वाढल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्येही लस घेण्यासाठी मोठा उत्साह असल्याचे रांजणगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन राठोड यांनी सांगितले.पुणे येथे पहिला डोस घेतलेल्या रमेश उत्तम ठाकूर व लता रमेश ठाकूर जेष्ठ नागरीक दाम्पत्याने शनिवारी चाळीसगावी महाराष्ट्रदिनी दुसरा डोस घेतला. 'मी मील कामगार होतो. त्यामुळे कामगारदिनीच कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्याचे मोठे समाधान असल्याची प्रतिक्रिया ठाकूर यांनी 'लोकमत'शी बोलतांना व्यक्त केली.
चाळीसगावी महाराष्ट्र दिनी अनेकांनी साधला 'लस' घेण्याचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 6:16 PM
महाराष्ट्र राज्य स्थापना दिनी शनिवारी अनेकांनी डोस घेतले.
ठळक मुद्देतरुण मात्र वेटिंगवरट्रामा सेंटरला दुसरा डोस घेणाऱ्यांची गर्दी