चाळीसगाव, जि.जळगाव : बाजार समितीच्या विद्यमान सभापती व उपसभापती यांचे राजीनामे घेऊन नूतन पदाधिका-यांची बिनविरोध निवड करण्याची यशस्वी शिष्टाई आमदार मंगेश चव्हाण यांनी केल्याने बुधवारी झालेल्या निवड प्रक्रियेत सभापतीपदी सरदारसिंग राजपूत तर उपसभापतीपदी किशोर भिकन पाटील हे विराजमान झाले. यामुळे बाजार समितीवरील भाजपचे वर्चस्वही कायम राहिले आहे. शेतकऱ्यांसाठी दहा रुपयात पोटभर जेवण आणि कृषी वाचनालय लवकरच सुरु करणार असल्याचेही मंगेश चव्हाण यांनी अश्वासित केले.बाजार समितीचे विद्यमान सभापती रवींद्र चुडामण पाटील व उपसभापती महेंद्र पाटील यांनी मध्यंतरी राजीनामे दिल्याने नूतन पदाधिकाºयांच्या निवडीसाठी बुधवारी बाजार समितीच्या सभागृहात दुपारी एक वाजता प्रक्रिया झाली.सभापतीपदासाठी सरदारसिंग राजपूत व विरोधकांतर्फे प्रकाश पाटील तर उपसाभापती पदासाठी किशोर भिकन पाटील तर विरोधकांतर्फे कल्याण पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. माघारीच्या वेळेत प्रकाश पाटील व कल्याण पाटील यांनी माघार घेतल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहिर करण्यात आले. बाजार समितीत भाजप- सेना प्रणित पॅनलचे १० सदस्य असल्याने बहुमत आहे. विरोधी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे सात सदस्य आहे. पंचवार्षिक निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी असतानाच ही निवड प्रक्रिया आमदारांच्या शिष्टाईने बिनविरोधही झाली.बाजार समितीला मोठी परंपरायावेळी बोलताना प्रदीप देशमुख यांनी सांगितले की, बाजार समितीला मोठी परंपरा आहे. राजकारण बाजूला ठेऊन येथे शेतकºयांच्या हितासाठी काम केले जाते. मावळते सभापती रवींद्र पाटील यांनी सांगितले की, चार वर्षाच्या कार्यकाळात सर्वांचे सहकार्य लाभले. यामुळेच कांदा मार्केट आम्ही सुरू शकलो. उपसभापती महेंद्र पाटील, अॅड.रोहिदास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.यावेळी ज्येष्ठ संचालक प्रदीप देशमुख, बारीकराव वाघ, मंिच्ंछद्र राठोड, प्रकाश पाटील, अॅड.रोहिदास पाटील, विश्वजीत पाटील, बळवंत वाबळे, शिरीषकुमार जगताप, धर्मा काळे, जितेंद्र वाणी, शोभाबाई पाटील, अलकनंदा भवर, सुरेश चौधरी या संचालक मंडळासह भाजपचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष व नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, कपील पाटील, नगरसेविका विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, अरुण अहिरे, आनंद खरात, सुनील निकम, रमेश सोनवणे, अमोल नानकर, जितेंद्र वाघ, अरुण पाटील, राजेंद्र पगार आदी उपस्थित होते.निवड प्रक्रिया सहाय्यक निबंधक प्रदीप बागूल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांना व्ही.एम.जगताप, बाजार समितीचे निवृत्त सचिव अॅड. सुभाष खंडाळे, प्र. सचिव अशोक पाटील, ज्ञानेश्वर गायके यांनी सहकार्य केले.शेतकºयांसाठी १० रुपयात जेवण : ‘लोकमत’ वृत्ताची दखलशेतकºयांचे हित डोळ्यासमोर ठेऊनच संचालक मंडळाने कामकाज करावे. यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सांगतानाच आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजार समितीचे संस्थापक सहकार महर्षि स्व.रामराव (जिभाऊ) पाटील यांच्या नावाने शेतकºयांसाठी अन्नपूर्णा योजनेंतर्गत १० रुपयात पोटभर जेवण येत्या आठवड्यात सुरू करणार असल्याचे नूतन पदाधिकाºयांचा सत्कार करताना सांगितले. शेतकºयांसाठी कृषी व वर्तमानपत्रांचे वाचनालय सुरू करण्याचेही सूतोवाच केले. पुढील वर्षी बाजार समितीचा अमृत महोत्सवही साजरा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. मोफत जेवणाचे आश्वासन आणि अमृत महोत्सवाचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेतल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.
चाळीसगाव बाजार समिती सभापती, उपसभापती निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 5:35 PM
बाजार समितीच्या विद्यमान सभापती व उपसभापती यांचे राजीनामे घेऊन नूतन पदाधिका-यांची बिनविरोध निवड करण्याची यशस्वी शिष्टाई आमदार मंगेश चव्हाण यांनी केल्याने बुधवारी झालेल्या निवड प्रक्रियेत सभापतीपदी सरदारसिंग राजपूत तर उपसभापतीपदी किशोर भिकन पाटील हे विराजमान झाले. यामुळे बाजार समितीवरील भाजपचे वर्चस्वही कायम राहिले आहे.
ठळक मुद्देआमदारांची शिष्टाई यशस्वीशेतकऱ्यांसाठी १० रुपयात जेवणकृषी वाचनालय सुरु करणार