आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.३ : चाळीसगाव औद्योगिक वसाहतीत स्थानिकांना रोजगाराच्या संधी यासह थेट पद्धतीने कामगार भरती प्रक्रिया, किमान वेतन, कामगारांना शासनाच्या सर्व सुविधा मिळणे, स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोक-यांमध्ये प्राधान्य द्यावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला.माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी ११ वाजता धडक मोर्चा काढण्यात आला. भाजपाने यावर राष्ट्रवादी राजकारण करीत असून आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातुन गेल्या तीन वर्षात औद्योगिक वसाहतीत ३५ कोटी रुपयांची मुलभुत विकासकामे केल्याचा दावा एका पत्रकान्वये केला आहे. मालेगाव रोड चौफुली येथुन राष्ट्रवादीच्या मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करीत मोर्चा एमआयडीसीतील भारत वायर रोप कंपनीच्या प्रवेशव्दारावर धडकला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह तरुणांनी हा परिसर दणाणून सोडला. कंपनीच्या व्यवस्थापकांनी निवेदन स्विकारले. येत्या आठ दिवसात सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आले. राष्ट्रवादीने मात्र कंपन्यांना पंधरा दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.मोर्चात तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांच्यासह जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, भूषण पाटील, अतुल देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, माजी जि.प.सदस्य मंगेश पाटील, अॅड.प्रदीप अहिरराव, नगरसेवक भगवान पाटील, भूषण ब्राम्हणकार, दीपक पाटील, शाम देशमुख, हरी जाधव आदी उपस्थित होते.
चाळीसगाव एमआयडीसीवर राष्ट्रवादीचा धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 7:17 PM
राष्ट्रवादीच्या मागण्या मान्य न झाल्यास १५ दिवसांनंतर पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा
ठळक मुद्देचाळीसगाव एमआयडीसीवर राष्ट्रवादीचा मोर्चामागण्यांच्या पूर्ततेसाठी दिला १५ दिवसांचा अल्टिमेटमराष्ट्रवादी राजकारण करीत असल्याचे काढले भाजपाने पत्रक