चाळीसगाव, जि.जळगाव : माजी नगराध्यक्ष कै.मधुकर उखाजी चौधरी यांनी ३० वर्षे पालिकेच्या सभागृहात नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष अशा जबाबदाऱ्या पेलून योगदान दिले. त्यांचे हे कार्य नेहमीच स्मरणात राहील, अशा शब्दात शहर विकास आघाडीचे गटनेते व माजी आमदार राजीव देशमुख यांना बुधवारी पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत आदरांजाली वाहिली. चौधरींच्या शोक प्रस्तावानंतर सभा तहकुब करण्यात आली. २४ रोजी तहकूब झालेली सभा होणार असून, नगरसेवक सुरेश हरदास चौधरी व रामचंद्र जाधव यांनी मधुकर चौधरी यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सभागृहात मांडला.नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात बुधवारी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. माजी नगराध्यक्ष मधुकर चौधरी व न.प.कर्मचारी मयूर वाघ यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर चौधरी यांचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. आदरांजली म्हणून सभा तहकूब करण्याची विनंतीही करण्यात आली. याला सभागृहाने संमती दिल्याने सभा तहकूब झाली. भाजपाचे गटनेते राजेंद्र चौधरी यांनीही दिवंगत मधुकर चौधरी यांच्या स्मृतींना उजाळा दिला.सभागृहात उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, शविआचे उपनेते सुरेश स्वार, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नितीन पाटील, आनंदा कोळी, रामचंद्र जाधव, शेखर देशमुख, अरुण आहिरे, आनंद खरात , सुरेश चौधरी, रवींद्र चौधरी , चिराग शेख, चंद्रकांत तायडे, संजय रतनसिंग पाटील, दीपक पाटील, विजया प्रकाश पवार, वत्सलाबाई महाले, रंजनाबाई सोनवणे, योगिनी ब्राह्मणकार, सविता राजपूत, मनीषा देशमुख, वंदना चौधरी, वैशाली मोरे, वैशाली राजपूत, विजया पवार, सायली जाधव, मानसिंग राजपूत, गीताबाई राजपूत, झेलाबाई पाटील, संगीता गवळी यांच्या सह मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
चाळीसगाव पालिकेची सभा प्रस्तावानंतर तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 6:04 PM
माजी नगराध्यक्ष कै.मधुकर उखाजी चौधरी यांनी ३० वर्षे पालिकेच्या सभागृहात नगरसेवक, उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष अशा जबाबदाऱ्या पेलून योगदान दिले. त्यांचे हे कार्य नेहमीच स्मरणात राहील, अशा शब्दात शहर विकास आघाडीचे गटनेते व माजी आमदार राजीव देशमुख यांना बुधवारी पालिकेच्या मासिक सर्वसाधारण सभेत आदरांजाली वाहिली. चौधरींच्या शोक प्रस्तावानंतर सभा तहकुब करण्यात आली.
ठळक मुद्देमाजी नगराध्यक्ष मधुकर चौधरींना श्रद्धांजलीयेत्या २४ रोजी होणार सर्वसाधारण सभा