चाळीसगाव : नाशिक आणि धुळे, औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमारेषांवर असणा-या चाळीसगाव बस आगारात शुक्रवारी कर्मचा-यांच्या संपामुळे पोलिस बंदोबस्तात बसफे-या सुरु झाल्या. एरवी गजबजलेल्या बसस्थानकात किरकोळ गर्दी होती.सकाळी चाळीसगाव बसस्थानकातून दुपारी १ वाजेपर्यंत एकुण सहा बसफे-या झाल्या. यात गुढे, घोडेगाव, पाटणादेवी आणि भडगाव, पाचोरा येथे बसेस सोडण्यात आल्या. शिवसेना प्रणित कामगार संघटनेचे आठ ते दहा कर्मचारी संपात सहभागी झालेले नाही. १६८ चालक, १४४ वाहक तर वर्कशॉपमधील ६४ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. चाळीसगाव आगारातून दरदिवशी एकुण २८५ बसफे-या होतात. मात्र शुक्रवारी संपामुळे हे दळणवळण पुर्णपणे कोलमडल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय झाली. यामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांमध्ये प्रवाश्यांनी एकच गर्दी केली होती. संपामुळे एसटीचे चाक थांबल्याने एका दिवसाला सात लाखाचे उत्पन्न बुडणार आहे.बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी अरविंद पाटील, शहर पोलीस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील, वाहतूक शाखेचे प्रमुख सुरेश शिरसाट व इतर पोलिस कर्मचारी बस स्थानकात उपस्थित आहेत.
चाळीसगावला पोलिस बंदोबस्तात बसफे-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:55 PM
चाळीसगाव : नाशिक आणि धुळे, औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमारेषांवर असणा-या चाळीसगाव बस आगारात शुक्रवारी कर्मचा-यांच्या संपामुळे पोलिस बंदोबस्तात बसफे-या सुरु झाल्या. एरवी गजबजलेल्या बसस्थानकात किरकोळ गर्दी होती.सकाळी चाळीसगाव बसस्थानकातून दुपारी १ वाजेपर्यंत एकुण सहा बसफे-या झाल्या. यात गुढे, घोडेगाव, पाटणादेवी आणि भडगाव, पाचोरा येथे बसेस सोडण्यात आल्या. शिवसेना प्रणित कामगार संघटनेचे ...
ठळक मुद्देएस.टी.च्या संपामुळे सात लाखाचा फटकाचाळीसगाव बसस्थानकात प्रवेशव्दारावर पोलिसांचा ताफादुपारपर्यंत केवळ सहा बसफेऱ्या