आॅनलाईन लोकमतचाळीसगाव,दि.२३ : एका घरगुती कार्यक्रमात त्यांची नजरानजर होते...प्रेमाच्या आणाभाका घेत ते चक्क रफुचक्कर होतात...मुलगा- मुलगी हरविल्याची तक्रार घरच्यांकडून पोलिस स्टेशनला दिली जाते...सापडलेल्या प्रेमीयुगलाचे थेट पोलिस स्टेशनच्या आवारातच शुभमंगल होते. एखाद्या चित्रपटातील लव्हस्टोरीचा क्लायमॅक्स वाटावा असा हा घटनाक्रम. सोमवारी दुपारी १.३० वाजता चाळीसगावला ग्रामीण पोलीस स्टेशनला खरोखर रेशीमबंधात बांधला गेला.पिंपळगाव बसवंत जि. नाशिक येथील २५ वर्षीय तरुण हिरापुर (ता. चाळीसगाव) येथे १५ रोजी घरगुती कार्यक्रमासाठी आला होता. याच कार्यक्रमात पाहुणी म्हणून आलेल्या एका १९ वर्षीय तरुणीची या तरुणासोबत नजरानजर झाली. दोघे एकमेकांच्या प्रेमात अडकले. दोघांची मने जुळल्यानंतर त्यांनी कार्यक्रमातून रफुचक्कर होत थेट शेगाव गाठतात त्यांनी एका मंदिरात विवाह केला.प्रेमीयुगलाचे आई- वडील व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मुलगा - मुलगी हरविल्याची तक्रार चाळीसगाव ग्रामीण पोलिसात देण्यात आली. त्यांचा शोध घेतला असता हे प्रेमीयुगल धुळे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक रवाना होऊन त्यांना पोलीस स्टेशनला आणले. या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा दोघांचा विवाह लावण्यात आला.
चाळीसगाव पोलीस स्टेशन मध्येच 'शुभ मंगल सावधान'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 10:55 PM
एका घरगुती कार्यक्रमात त्यांची नजरानजर होते...प्रेमाच्या आणाभाका घेत ते चक्क रफुचक्कर होतात...मुलगा- मुलगी हरविल्याची तक्रार घरच्यांकडून पोलिस स्टेशनला दिली जाते...सापडलेल्या प्रेमीयुगलाचे थेट पोलिस स्टेशनच्या आवारातच शुभमंगल होते.
ठळक मुद्देचाळीसगाव येथे एका घरगुती कार्यकक्रमात झाली भेटप्रेमीयुगल धुळे येथे असल्याची मिळाली पोलिसांना माहिती.पोलीस स्टेशनमध्ये आणत लावला दोघांचा विवाह