चाळीसगाव, जि.जळगाव : जळगाव जिल्हा परिषदेच्या १७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत चाळीसगाव पंचायत समिती सभापती स्मितल दिनेश बोरसे यांनी शासनाची वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होण्यासाठी ‘बिहार पॅटर्न’ लागू करण्याचा मुद्दा मांडला. त्यांच्या या सूचनेचे सगळ्यांनी स्वागत केले आहे.शासनातर्फे लागवड करण्यात येणाऱ्या वृक्षांचे संगोपन अपेक्षित त्या प्रमाणांत होत नसल्याने झालेली लागवड यशस्वी होत नाही. म्हणून त्यांनी संपूर्ण सभागृहाला आवाहन केले की, प्रत्येक पंचायत समितीमार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून ‘बिहार पॅटर्न’ संकल्पना यशस्वीपणे राबविता येणे शक्य आहे. यामध्ये ५०० वृक्षांसाठी सहा लाख रुपये व एक हजार वृक्षांसाठी १२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार होते व संगोपनासाठी लागणारे मनुष्यबळ, पाणी, खते व ट्री गार्ड घेऊन वृक्ष लागवड मोहीम यशस्वी करणे सहज शक्य होते. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांनी या सुचनेला अत्यंत महत्वपूर्ण म्हटले. तसेच जिल्हा परिषदचे ज्येष्ठ सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी सभापतींचे मनापासून कौतुक केले. यापूर्वीही स्मितल बोरसे यांनी जि.प. शाळेमधील विद्युत पुरवठ्याविषयी मत मांडले होते. संपूर्ण जिल्हयातील शाळांचे वीज बिल ग्रा.पं.च्या चौदाव्या वित्त आयोगामार्फत भरण्यात आले होते. त्यामुळे सर्व शाळांमध्ये आता विद्युत पुरवठा सुरळीत असल्याचे दिसून येते.
चाळीसगाव पं.स. सभापतींनी जि.प. सभेत मांडला ‘बिहार पॅटर्न’चा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 5:24 PM
जळगाव जिल्हा परिषदेच्या १७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत चाळीसगाव पंचायत समिती सभापती स्मितल दिनेश बोरसे यांनी शासनाची वृक्ष लागवड मोहीम यशस्वी होण्यासाठी ‘बिहार पॅटर्न’ लागू करण्याचा मुद्दा मांडला. त्यांच्या या सूचनेचे सगळ्यांनी स्वागत केले आहे.
ठळक मुद्देसूचनेचे सगळ्यांनी केले स्वागतवृक्ष लागवडीसाठी अंदाजपत्रक