चाळीसगाव, जि.जळगाव : संत निरंकारी मंडळातर्फे शनिवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मंडळाच्या ५० सभासदांनी येथील ग्रामीण रुग्णालयासह परिसर तासाभरात चकाचक केला. यामुळे उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.सद्गुरू बाबा हरदेवसिंगजी महाराज (निरंकार बाबा) यांच्या जन्मदिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्लीमार्फत दरवर्षी पूर्ण जगात स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येते. याचा एक भाग म्हणून शनिवारी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानादरम्यान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात वैद्यकीय अधिकारी व संबंधित घटकांची बैठक घेतली. या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.करंबळेकर, डॉ.दीपक पाटील, पालिकेच्या देशमुख यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या वेळी संत निरंकारी मंडळाचे शाखाप्रमुख झुलेलाल गुरुमुखदास पंजाबी, सेवादल संचालक सतीश सुकलाल भालेराव, सेवादल शिक्षक ईश्वर रामचंद्र कुमावत, बाबाजी बारकू राठोड, सागर पवार, विठ्ठल राठोड, हिरामण देहाडे, सचिन जाधव, कृष्णा कुमावत, चारुशिला भाटेकर, मनीषा मराठे, स्वाती जाधव, राजश्री मराठे, पूजा राठोड, सुवर्णा कवडे यांच्यासह २० पुरुष व ३० महिला सेवेकरी उपस्थित होत्या.स्वच्छता अभियान राबविण्याआधी स्वच्छतेचा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. स्व.चंदीराम बजाज हॉल, सिंधी कॉलनीपासून रॅली काढण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात रॅलीचा समारोप झाला.
चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय झाले तासाभरात चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:14 AM
संत निरंकारी मंडळातर्फे शनिवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मंडळाच्या ५० सभासदांनी येथील ग्रामीण रुग्णालयासह परिसर तासाभरात चकाचक केला.
ठळक मुद्देस्तुत्य उपक्रमाने उपस्थित प्रभावितसंत निरंकारी मंडळाचा पुढाकारमंडळाने घेतली अधिकाऱ्यांसोबत बैठक