हिरापूर, ता.चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगावहून नांदगावला जाणाऱ्या नांदगाव आगाराच्या बसचा स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे स्टेरिंग एका बाजूला ओढला गेला. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात आदळली. यात बसचालक प्रकाश वाल्मीक राठोड यांच्यासमवेत सात ते आठ प्रवाशांना किरकोळ मार लागून जखमी झाले. हिरापूर रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.यात कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने चाळीसगाव येथे हलवण्यात आले होते. बस (एमएच-१४-बीटी-०३८०) मध्ये तब्बल ५५ ते ६० प्रवाशी प्रवास करत होते. पण बसचालक प्रकाश वाल्मीक राठोड यांनी प्रसंगावधान दाखवून शेवटपर्यंत हातातले स्टेरिंग सोडले नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.बसच्या अपघातानंतर बस जाऊन खड्ड्यात आदळल्यामुळे मोठा आवाज झाल्याने आवाज ऐकून जवळ शेतातील नागरिक व हिरापूर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन बसमधील जखमींना व इतर प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यास मदत केली.
चाळीसगाव तालुक्यात हिरापूर जवळ स्टेरिंग तुटून बस कोसळली खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:47 PM
चाळीसगावहून नांदगावला जाणाऱ्या नांदगाव आगाराच्या बसचा स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे स्टेरिंग एका बाजूला ओढला गेला. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात आदळली.
ठळक मुद्देचालकासह सात-आठ प्रवासी किरकोळ जखमीचालकाचे प्रसंगावधान