जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे. महसूल यंत्रणा निवडणुकीच्या कामात असल्याने अद्यापही नुकसानीचे पंचनामे झालेले नाही. बाजार समितीतही मका व अन्य शेतमालाचे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करुन मदत मिळावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.गेली तीन वर्ष चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ मुक्कामी असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आहे. यावर्षी जानेवारीच्या सुरुवातीला अभूतपूर्व पाणीटंचाई उदभवल्याने जनावरांच्या चारा-पाण्याचे प्रचंड हाल झाले. पाणीटंचाईमुळे नागरिकदेखील हतबल झाले होते. सुरुवातीला पावसाने ओढ घेतली. मात्र उत्तरार्धात त्याची हजेरी नियमित झाल्याने यंदा चांगले उत्पन्न येण्याच्या शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाचा अवकाळी मारा सुरू असून शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घासच हिरावल्यासारखी स्थिती असल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे.धान्य पिकांचे नुकसानचाळीसगाव तालुक्यात कपाशी पेºया खालोखाल धान्य पिकांची लागवड होते. यामुळे बाजरी, ज्वारी व कडधान्ये पिकांची कापणी करण्यात आली होती. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेली पूर्णपणे भिजून वाया गेली आहे. ज्वारीच्या कणसांना पुन्हा कोंब फुटले आहेत. ज्वारी काळपट होईल, असे शेतकºयांनी सांगितले.काही ठिकाणी कांदा पिकाचीही लागवड करण्यात आली. मात्र पावसाची संततधार सुरू असल्याने शेतांमध्ये पाणी साचले आहे. चढ्या दराने खरेदी केलेली रोपे कुजू लागली आहे. यात शेतकºयांना फटका बसला आहे.मे व जूनमध्ये लागवड केलेले कपाशी पीक वेचणीला आले असताना ते पावसाच्या खिंडीत सापडले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे.बाजार समितीत 'मक्याला' फुटले 'कोंब'बाजार समितीत गेल्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर मक्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापाºयांनी खरेदी केलेला मका बाजार समितीतच पडून आहे. गेल्या चार दिवसांपासून पावसाचे धूमशान सुरू असल्याने तीन हजार क्विंटल मका पूर्णपणे भिजला आहे. मंगळवारी मका सुकवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सायंकाळी आलेल्या पावसाने तो पुन्हा भिजला. भिजल्याने मक्याला कोंब फुटले आहेत. व्यापाºयांचे ५० लाखांचे नुकसान झाले आहे.पंचनामे तातडीने कराअवकाळी पावसाने यावर्षी शेतकºयांचे कंबरडे मोडले असून तो कोलमडून पडला आहे. धान्य, कडधान्य, कापूस व मका पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतमाल भिजल्याने कुजू लागला आहे. महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत. आम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार आहोत.- दिनेश पाटीलतालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, चाळीसगाव
चाळीसगाव तालुक्यात अवकाळी माऱ्याने शेतमालाचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 3:53 PM
गेली तीन वर्षे दुष्काळाचा दाह सहन करणाºया शेतकºयांचा यंदाही हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाच्या माºयाने मातीमोल झाला असून, ६० टक्के उत्पन्नाला फटका बसण्याची शक्यता शेतकºयांनी बोलून दाखवली आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना पंचनाम्यांची प्रतीक्षा६० टक्के उत्पन्नाला फटकाबाजार समितीतही ५० लाखांचे नुकसानबाजार समितीत 'मक्याला' फुटले 'कोंब'पंचनामे तातडीने करा