आॅनलाईन लोकमतचाळीसगाव दि. ११ :- शेतकºयांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे महाराष्ट्राची देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील कामे ही जिल्ह्यात आदर्श ठरतील असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. तालुक्यातील वाघळी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाºयाची पाहणी त्यांनी केली.यावेळी आमदार उन्मेष पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य पोपट भोळे, के. बी. साळुंखे, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, विश्वास चव्हाण, उपविभागीय अधिकारी शरद पवार, तहसीलदार कैलास देवरे तालुका कृषी अधिकारी आर. एम. राजपूत, जिल्हा परिषदच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर. के. नाईक, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत शिंपी, पं.स. सदस्य भाऊसाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.मंत्री शिंदे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाºयातील साठलेले पाणी पाहून शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसत आहे. या अभियानामुळे परिसरातल्या विहीरींच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होवून त्यांचा विकास होणार आहे. या योजनांचा शेतकºयांनी लाभ घेवून आपला विकास साध्य करावा असेही त्यांनी सांगितले.जलसंधारण विभागामार्फत चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे ४७.७० लाख रुपये खर्च करीत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधारा व वाघळी येथील मधुई देवी जवळ ४७.६१ लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाºयाच्या फलकाचे अनावरण तसेच पाण्याचे जलपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यातील जलयुक्त शिवाराची कामे जिल्ह्यासाठी आदर्श - जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 5:58 PM
वाघळी येथील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट नाला बंधाºयाची पाहणी
ठळक मुद्देचाळीसगाव तालुक्यातील सिमेंट नाला बंधाºयाची पाहणीपरिसरातल्या विहीरींच्या पाण्याच्या पातळीत वाढमंत्र्यांच्या हस्ते फलकाचे अनावरण व पाण्याचे जलपुजन