आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.१ : चाळीसगाव तालुक्यात यंदा अवकाळी पावसामुळे मका उत्पादक शेतकºयांना बुरे दिन पहावयास मिळत आहे. मका भिजल्याने त्याचे रूपांतर 'डागी' मध्ये झाले. डागी मक्यामुळे दर कोसळले असून शासकीय खरेदी केंद्रावर ३१ डिसेंबर अखेर बोहोनीही झाली नसल्याची स्थिती आहे.चाळीसगाव तालुक्यात खरीपाचा पेरा ९० हजार हेक्टर क्षेत्रावर केला जातो. मात्र पावसाअभावी यंदा हे क्षेत्र ७५ ते ८० हजार हेक्टरपर्यंतच पोहचले. सिंचनाखालील पिकांसमोरही पाणीबाणी असल्याने कपाशीच्या खालोखाल असणारा मक्याचा पेरा घटला.अवकाळी पावसामुळे मक्याचे दर घसरलेयावर्षी खरीपात पावसाचे वेळापत्र कोलमडले. पिकांना आवश्यकता होती त्यावेळी पाऊस गायब झाला. याचा थेट परिणाम उत्पन्नावरही देखील झाला आहे. १५ ते १८ टक्क्यांनी त्यामुळे उत्पन्न घटले असल्याचे शेतकºयांनी सांगितले. मका काढणीला आला असतांनाच अवकाळी पावसाने त्याला झोडपून काढले. यामुळे मक्याची प्रतवारी बिघडली. तो काळा पडल्याने 'डागी' झाला.प्रतिक्विंटल २०० रुपये फटकागेल्यावर्षी बाजार समितीत मक्याच्या दराला तेजी होती. एक हजार ३५० रुपये प्रतिक्विंटल असे दर उसळी घेत होते. यंदा मात्र डागी मक्याचे उत्पादन जादा आल्याने अकराशे रुपये असे भाव मिळत आहे. उत्पादक शेतकºयांना क्विंटल मागे २०० रुपयांचा फटका बसत आहे.मक्याची आवक मंदावलीचाळीसगाव बाजार समिती मध्यवर्ती स्थानी असल्याने परजिल्ह्यातुनही शेती मालाची आवक होते. दिवाळीनंतर मक्याची आवक वाढली असला तरी नव्या वर्षात आवक मंदावली असल्याचे व्यापा-यांनी सांगितले. सोमवारी बाजार समितीत केवळ ३५ ट्रॅक्टर आवक झाल्याचे बाजार समितीच्या सुत्रांनी सांगितले.शासकीय खरेदी केंद्रावर शुकशुकाटआर्द्रतेचे प्रमाण जादा असल्याने शेतकरी सहकारी संघाच्या खरेदी केंद्रावर पुर्णपणे शुकशुकाट होता. शासकीय दर एक हजार ४२५ रुपये प्रतिक्विंटल असला तरी शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार मका विक्रीला आला नाही. त्यामुळे या केंद्रावर महिनाभरात एक किलो देखील मका खरेदी केला गेला नाही. अशी माहिती शेतकरी सहकारी संघाचे चंद्रकांत शिरसाठ यांनी दिली.
चाळीसगाव तालुक्यात 'डागी' मक्यामुळे दर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 3:45 PM
शासकीय खरेदी केंद्रावर सर्वत्र शुकशुकाट
ठळक मुद्देशासकीय खरेदी केंद्रावर शुकशुकाटचाळीसगाव तालुक्यात मक्याची आवक मंदावलीयावर्षी मक्याला प्रतिक्विंटल २०० रुपये फटका