चाळीसगाव : ओळखीच्या लोकांना चोरीच्या मोटारसायकली विकणाऱ्या पहिलवान चोरट्यावर शहर पोलिसांनी झडप घालून त्याच्याकडून चोरीच्या १४ मोटारसायकली हस्तगत केल्या. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. टाकळी प्र.चा. परिसरातील शिवशक्ती नगरातील राजेंद्र खंडू पवार यांची ३० हजार रुपये किमतीची एम.एच.- १९ सी. पी. १९९२ ही मोटारसायकल २० मे ते २१ मे २०१९ च्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली होती. त्याचा तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत असतांना एक संशयीत आरोपी शहरातील मार्केटच्या जवळ मोटारसायकल घवून संशयीतरित्या व विक्री करावयाची असल्याचे सांगत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना मिळाली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे फौजदार युवराज रबडे, पोलीस हवालदार बापुराव भोसले, पोलीस अभिमन पाटील, राहुल पाटील, विजय शिंदे, नितीन पाटील, संदीप तहसीलदार, प्रेमसिंग राठोड, पो.कॉ. राहुल गुंजाळ, पवीण सपकाळे, गोपाल बेलदार, तुकाराम चव्हाण, संदीप पाटील, भगवान माळी, गोवर्धन बोरसे यांनी त्याठिकाणी सापळा रचून आरोपी जय शरद पवार (२०) रा. पाटखडकी ता. चाळीसगाव यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याने विंचूर फाटा येथून १, मनमाड रेल्वे पुलावरुन २, नांदगाव रेल्वे स्टेशन वरुन ३, जळगाव रेल्वे स्टेशन १, गिरणा डॅम २, लासलगाव रेल्वे स्टेशन १, कजगाव १, नाशिक १ व इतर ठिकाणाहून ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या एकूण १४ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी जिम मध्ये व्यायमासाठी जात असल्याने तेथील लोकांना विश्वासात घेवून त्यांना मोटारसायकली विकल्याची कबुली त्याने दिली आहे.
चाळीसगावला चोरट्यांकडून १४ दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 4:32 PM