चाळीसगाव: पाटणादेवीच्या धवलतीर्थ धबधब्यातून उगम पावणा-या डोंगरी नदीला गुरुवारी मध्यरात्री पूर आल्याने नदीपात्रात उभारलेल्या अनधिकृत झोपड्या व त्यातील संसारपयोगी वस्तू वाहून गेल्या आहे. यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी पाटणदेवी रस्त्यापर्यंत पोहचले होते.बामोशी बाबा दगार्हात येणारे परजिल्ह्यातील भाविक लगतच्या डोंगरी नदीपात्रात तात्पुरत्या रहिवासासाठी झोपड्या उभारतात. नदीपात्रात दुकानांचेही अतिक्रमण झाले आहे. झोपड्या अनधिकृतपणे उभारल्या जातात. गेल्या तीन ते चार दिवसांपासून अधुनमधून पाऊस होत असल्याने गुरुवारी रात्री डोंगरी नदीला पूर आला. पुरात नदीपात्रातील अनधिकृत झोपड्या वाहून गेल्याने परजिल्ह्यातील गरिब नागरिक उघड्यावर पडले आहे. त्यांच्याकडील जीवनावश्यक साहित्यही वाहून गेले आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही........चौकटपरिसरातील नागरिकांनी केली होती मदतमंगळवारी देखील पावसाची स्थिती पाहता परिसरातील काही नागरिक व तरुण यांनी नदीपात्रात झोपड्यांमध्ये राहणा-या परजिल्ह्यातील नागरिकांना रात्री ११ वाजता रांजणगाव दरवाज्याजवळील टाऊन हॉल मध्ये हलविले होते. यासाठी पत्रकार सुनील राजपूत व त्यांचे मित्र मदतीसाठी धावून गेले होते. शंभरहून अधिक नागरिकांची टाऊनहॉल मध्ये झोपण्याची व्यवस्थाही केली होती. गुरुवारी मध्यरात्री आलेल्या पुरामुळे मात्र या झोपड्या वाहून गेल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे.
चाळीसगावला डोंगरी नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 7:42 PM