शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

‘पद्मदुर्ग’ला चाळीसगावच्या ‘तोफगाड्याची सलामी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 6:17 PM

‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे...’ अशा ओळी सहज गुणगुणल्या तरी छाती अभिमानाने फुगून येते. गड-किल्ल्यांवर असणाऱ्या तोफा जणू शौर्याची गाथाच! याच इतिहासावर आपल्या कलाकुसरीची फुले वाहतांना चाळीसगावच्या कारागिरांनी रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग येथे लावण्यात येणारे चार कलात्मक ‘तोफगाडे’ साकारले आहेत.

ठळक मुद्देचाळीसगावकरांसाठी अभिमानास्पद बाबपाश्चिमात्य लूकयुवा उद्योजकाचे दातृत्वदोन महिन्यात तयार झाले चार तोफगाडे

जिजाबराव वाघचाळीसगाव : ‘स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे...’ अशा ओळी सहज गुणगुणल्या तरी छाती अभिमानाने फुगून येते. गड-किल्ल्यांवर असणाऱ्या तोफा जणू शौर्याची गाथाच! याच इतिहासावर आपल्या कलाकुसरीची फुले वाहतांना चाळीसगावच्या कारागिरांनी रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग येथे लावण्यात येणारे चार कलात्मक ‘तोफगाडे’ साकारले आहेत. यासाठी येथील युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांनी दोन लाखाचे दातृत्व दिले असून, सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून तयार झालेल्या तोफगाड्यास पाश्चिमात्य लूक दिलाय. १९ रोजी पद्मदुर्गला या तोफगाड्यांची सलामी दिली जाणार आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधतानाच महाराष्ट्रातल्या बहुसंख्य डोंगर शिखरांवर चढवलेला किल्ल्यांचा साज आजही रोमांच उभे करतो. परकीय सत्तांना थोपविण्यासाठी बांधलेले जलदुर्ग म्हणजे आगळेवेगळे वैशिष्ट्यच. रायगडजवळ उभारलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावर सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे व उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या संकल्पनेतून चार तोफगाडे गेल्या दोन महिन्यापासून चाळीसगाव येथील चार लाकूड काम करणारे कारागिर तयार करीत असून, १९ मे रोजी एका मोठ्या दिमाखदार सोहळ्यात या तोफगाड्यांवर पद्मदुर्गच्या तोफा ठेवण्यात येणार आहे.साडेसहाफूट लांबीचा तोफगाडा, एक हजार किलो वजनमध्ययुगीन काळातील कलाकुसर साकारताना कारागिरांची कसोटी लागते. ऐतिहासिक वस्तुंची डागडुजी करतानाही त्यांचे पुरातन वैभव जपणे आवश्यक असते. चाळीसगावच्या गणेशरोडलगतच्या गंगा सॉ मिलचे मालक आणि दुर्गप्रेमी अजय जोशी यांनी तोफगाडे तयार करण्याचे आवाहन पेलले. त्यांच्यासह कारागिर दिलीप अहिरे, भगवान शिंदे, सुनील शिंदे यांच्यासह स्वत: अजय जोशी गेल्या दोन महिन्यांपासून चार तोफगाडे बनवित आहे. लवकरच हे तोफगाडे पद्मदुर्गकडे आगेकुच करणार आहेत.साडेसहा फूट लांब व दोन फूट रुंदीचे चार तोफगाडे पूर्णपणे सागवान लाकडात तयार करण्यात आले आहे. तोफगाड्याचे वजन एक हजार किलो आहे. काही प्रमाणात लोखंड आणि लाकूड यांचा वापर केला गेला आहे.पद्मदुर्गवर बसविण्यात येणाºया तोफगाड्यांना पारंपरिक रुपडे देण्याऐवजी अजय जोशी स्काटलँड येथील पाश्चिमात्य तोफगाड्याचा लूक दिला आहे. देशात प्रथमच असे पाश्चिमात्य तोफगाडे बनविल्याचा त्यांचा दावा आहे. सोयगाव येथील वेताळगडावर नुकताच एक तोफगाडा बसविण्याचा सोहळा पार पडला. हा तोफगाडादेखील अजय जोशी यांनीच साकारला आहे.दोन लाखाचे दातृत्वचाळीसगाव येथील युवा उद्योजक मंगेश रमेश चव्हाण यांनी तोफगाडे तयार करण्याचे दातृत्व स्वीकारले आहे. एका तोफगाड्यासाठी ५० हजार रुपये खर्च आला आहे. याआधीही चव्हाण यांनी शहरात १६ ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासह तालुक्यातील काही प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळांचे साहित्य दिले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकChalisgaonचाळीसगाव