आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ६६ उमदेवार गैरहजर राहिले. या उमेदवारांना शेवटच्या दिवशी संधी दिली जाणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘लोकमत’ ला दिली. दरम्यान, सोमवारी ५०० उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी ४३४ उमेदवार हजर होते. त्यातील ४२२ उमेदवार विविध चाचणीत पात्र ठरले व १२ उमेदवार अपात्र ठरले आहेत.पात्र ठरलेल्या ४२२ उमेदवारांची मंगळवारी १६०० मीटर धावण्याची चाचणी घेतली जाणार आहे. तर नवीन ८०० उमेदवारांना बोलावण्यात आले आहे.पहाटे पाच ते अकरा चालली प्रक्रियापोलीस कवायत मैदानावर पहाटे पाच तर सकाळी ११ वाजेपर्यत ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात सुरुवातीला कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर अर्जाची पडताळणी झाली. १०० मीटर धावणे, उंची, छाती मोजमाप, गोळा फेक, लांब उडी व पुलअप्स आदी चाचण्या घेण्यात आले. त्यात ४२२ उमेदवार पात्र ठरले. २७ कॅमेºयाद्वारे व्हीडीओ चित्रणपोलीस भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेºयाच्या निगराणीत होत आहे. त्यासाठी प्रत्येक चाचणीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मध्यभागी पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे तर समोर अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही अधिकारी पहाटे चार वाजेपासून मैदानावर तळ ठोकून होते. असा आहे भरती बंदोबस्तपोलीस अधीक्षक : १अपर पोलीस अधीक्षक : १पोलीस उपअधीक्षक : ६पोलीस निरीक्षक : १६सहायक निरीक्षक : २०उपनिरीक्षक : ३५पुरुष कर्मचारी : २५३महिला कर्मचारी : ५२कॅमेरामन : २७
पुरुष अर्ज : १३ हजार ९५६ महिला अर्ज : २ हजार ३८३ एकुण अर्ज : १६ हजार ३३९