चांगदेव, ता. मुक्ताईनगर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शुक्रवारी श्री क्षेत्र चांगदेव महाराजांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.पहाटेपासून भाविकांची गर्दी पहाटेपासूनच भाविकांनी चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठमोठ्या रांगा दर्शनासाठी लागल्या होत्या. आज पहाटेपासून दिंड्यांचे आगमन सुरू झाले यात प्रामुख्याने गजानन महाराज संस्थान शेगाव, मुक्ताई दिंडी गोमाजी महाराज तसेच लहान मोठ्या दिड्यांचे आगमन दिवसभर सुरू होते.मंदिर परिसर फुलला चांगदेव महाराज मंदिर परिसर भाविकांनी फुलला होता. मंदिर परिसरात पूजा साहित्य व विविवध दुकाने होती.विविध संस्थांकडून फराळ वाटपआज महाशिवरात्रीच्या पर्वावर दुधाळा मारुती येथे चैतन्य मित्र मंडळ खंडेराववाडी व दुधाळा शिवार शेतकरीवर्ग यांच्यामार्फत फराळ वाटप करण्यात आले. गुरुकुल वारकरी शिक्षण संस्थेमार्फत अध्यक्ष हभप विष्णू पुजारी यांनी चहा फराळ वाटप केले तसेच धुपेश्वर दिंडीला प्रवीण चौधरी, संदीप चौधरी यांच्यामार्फत फराळ वाटप करण्यात आले.भाविकांनी घेतला नौकानयनाचा आनंदतापी पूर्णाच्या पवित्र संगमावर चालक-मालक संघटनेच्या वतीने वीस बोट भाविकांना संगम दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भाविक मोठ्या संख्येने नौकानयनाचा आनंद घेत होते. चालक-मालक नावाडी संघटनेचे सदस्य तापी-पूर्णा संगमावर दिवसभर सतर्क होते. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोई व सचिव संजय भोई आदी लक्ष ठेऊन होते.ग्रामपंचायत तर्फे विविध सुविधाग्रामपंचायत मार्फत यात्रेत विविध सुविधा पुरवण्यात आल्या. तर पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्यसेवा, बससेवा, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेत अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम विकास अधिकारी बी. एन. चौधरी, आरोग्य अधिकारी संदीप जैन, वीज अधिकारी अमोल राणे, ग्रामपंचायत सदस्य किरण इंगळे, पंकज कोळी, अतुल पाटील, जिवराम महाजन, मिथुन महाजन आदी दिवसभर कार्यालयात हजर होते.
चांगदेवला भाविकांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 5:00 PM