शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

स्वत:मध्ये बदल करा म्हणजे दु:ख नाहीसे होईल -प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 2:52 PM

स्वत:मध्ये परिस्थितीनुरूप बदल केले पाहिजे. म्हणजे दु:ख नाहीसे होईल, असे प्रतिपादन प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले.

ठळक मुद्देरोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी प्रतिपादन२८ हजार प्रेक्षकांनी या व्याख्यानमालेचा घेतला लाभ

भुसावळ : आजच्या परिस्थितीत चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींकडे माणसाचे मन झुकलेले आहे. आपल्या आजूबाजूला नेहमीच नकारात्मक गोष्टी ऐकण्यास व पहावयास मिळते. यामुळे आपले मनदेखील नकारात्मक होऊन आपल्या मनात द्वंद सुरू होत असतात. मग जीवनात दु:ख येते. या दु:खाला हरवायचे असेल तर मन प्रसन्न ठेवले पाहिजे. स्वत:मध्ये परिस्थितीनुरूप बदल केले पाहिजे. म्हणजे दु:ख नाहीसे होईल, असे प्रतिपादन प.पू.महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी केले.रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅलीतर्फे ‘द्वंद जीवनाचे’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे बारावे पुष्प व समारोपीय व्याख्यान परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांनी केले.यावेळी रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांनी समाजमनावर होणाऱ्या वाईट परिणामांना घालवण्यासाठी व जीवन आनंदी करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.क्लबचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे म्हणाले की, कोरोनाच्या काळात सर्वजण घरामध्ये लॉकडाऊन झाले होते. या सर्वांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजवला जावा या दृष्टिकोनातून विविध विचारवंतांची व्याख्याने आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी आयोजित करण्यात आली.प्रोजेक्ट सेक्रेटरी संजीव भटकर यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहितीदिली. बारावे पुष्प जनार्दन हरीजी महाराजांनी गुंफले. त्यांचा परिचय प्रोजेक्ट कोआॅर्डिनेटर जीवन महाजन यांनी करून दिला.यावेळी बोलताना जनार्दन महाराज म्हणाले की, जीवन जगत असताना मनामध्ये द्वंद सुरू असते. हे द्वंद्व संपवायचे असेल तर चांगल्या गोष्टी, सकारात्मक विचार केले पाहिजे. यासाठी आपले मन शांत करून प्रसन्न कसे असेल याकडे लक्ष दिले पाहिजे. मन प्रसन्न असेल तर सर्वसिद्धी होतात. मनोबल वाढवले पाहिजे. जीवनातील हे युद्ध जिंकण्यासाठी मनोबल वाढणे आवश्यक आहे. जीवन जगण्याचा मंत्र समजला पाहिजे. मनाला स्थिर करण्यासाठी साधना केली पाहिजे. विज्ञान व अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, तर दु:ख मानवनिर्मित असून आनंद ईश्वरनिर्मित आहे. सुखदु:ख सम असले पाहिजे. सकारात्मकतेसाठी स्वत:पासून सुरुवात करा. अंधश्रद्धेने मनोवृत्ती वाढू शकत नाही. घरात प्रेम, जिव्हाळा नात्यात असले पाहिजे कुटुंबामध्ये संवाद घडवून विवाद टाळले पाहिजे. संकुचित मन न ठेवता मनाचा मोठेपणा ठेवा. चांगले आचरण करा. आपल्या अंगी त्याग श्रद्धा प्रेम असले पाहिजे. एखाद्या चित्रात रंग भरल्यानंतर जसे सुंदर दिसते तसेच आपल्या जीवनातदेखील आपण रंग भरले पाहिजे. अडचणींवर मात करत आपण मार्गक्रमण केले पाहिजे. क्षमा करणे हे एक मोठेपण असून यामुळेदेखील दु:खाची तीव्रता कमी होते. महत्त्वाकांक्षा, सन्मान, लोभी वृत्तीचा त्याग करा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकदेखील समजून घेतला पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे स्वत:चे कुटुंबाचे व समाजाचे जीवन आनंदी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे यांनी, तर आभार प्रोजेक्ट चेअरमन सुनील वानखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्लबचे सेक्रेटरी राम पंजाबी व प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रदीप सोनवणे यांनी परिश्रम घेतले.२८ हजार प्रेक्षकांनी या व्याख्यानमालेचा घेतला लाभकोरोनाच्या काळामध्ये आॅनलाइन झूम अ‍ॅप व फेसबुक पेज लाईव्हवरून सुरू व्याख्यानमाला घेण्यात आली. सर्वत्र नकारात्मक भूमिका असताना व कुटुंबामध्ये कलह कमी करण्यासाठी आनंदी जीवनासाठी या व्याख्यानमालेला आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी व रविवारी वक्ते संवाद साधत होते.या व्याख्यांमध्ये विविध विचारवंतांनी आपले विचार मांडले आणि या विचारांचा लाभ महाराष्ट्राभरातून २८ हजारावर श्रोत्यांनी घेतला. ही सर्व व्याख्याने रोटरी क्लब आॅफ ताप्ती व्हॅली भुसावळ या फेसबुक पेजवर उपलब्ध असून याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ